आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ मधील फर्स्ट लूक पोस्टर

movie Brahmastra first look
movie Brahmastra first look
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

'गंगुबाई काठियावाडी' नंतर आता आलिया भट्टचा 'ब—ह्मास्त्र' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. खरे तर त्यामध्ये रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुनसारखे अन्यही बडे कलाकार असले तरी सध्या आलियाच्याच नावाचा डंका वाजत आहे. त्यामुळे मंगळवारी (15 मार्च) तिच्या 29 व्या वाढदिवसाचे निमित्त करून 'ब—ह्मास्त्र'च्या मेकर्सनी चित्रपटातील आलियाचे फर्स्ट लूक पोस्टर रीलिज केले. तसेच तिच्या लूकचा एक मोशन व्हिडीओही शेअर करण्यात आला. या चित्रपटात आलिया 'ईशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट एक 'सुपरहीरो मुव्ही' आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट हिंदीशिवाय तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्‍नड भाषेत 9 सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news