अल्वेज अ स्टनर!

अल्वेज अ स्टनर!
Published on: 
Updated on: 

खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्टार बनलेली भारतीय तारका म्हणजे प्रियांका चोप्रा. टी.व्ही., वेबसीरिज आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून ती जगभरातील प्रेक्षकांसमोर आलेली आहे. अनेक हॉलीवूडपटांमध्ये झळकत असलेली प्रियांका फॅशनच्या क्षेत्रातही झळाळत असते. आताही तिचे पॅरिसमधील काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. ब्लॅक अँड व्हाईट पोशाखातील या फोटोंना तिने 'इटस् नेव्हर जस्ट ब्लॅक अँड व्हाईट' अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या फ्रीलच्या बॅकलेस, वनपीस पोशाखातील फोटोंना चाहत्यांबरोबरच अनेक सेलिबि—टींनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. माधुरी दीक्षितने तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत असताना 'अल्वेज अ स्टनर' असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news