मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. अरबाज खान आणि मलायकाने घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटाच्या अगोदरच मलायका अर्जुन कपूरला डेट करत होती. आता यावर मलायका पहिल्यांदाच घटस्फोटावर बोलली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका म्हणाली, आता माझ्यात आणि अरबाजमध्ये चांगले संबंध आहेत. आम्ही दोेघेही बर्यापैकी समजूतदार आहोत. आम्ही खूश आहोत. पूर्वीपेक्षा शांत आहोत. अरबाज एक चांगला व्यक्ती आहे. माझी इच्छा आहे की, त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व सुख मिळो. कधी कधी असे होते की, माणसे चांगली असतात फक्त ती एकत्र असणे चांगले नसते. आता जे जसे आहे तसे आहे, तरीही त्याचे भले व्हावे, असेच मला कायम वाटते. मी पूर्वीपेक्षा आता जास्त खूश असते आणि यात मी आनंदी आहे. एवढेच नाही, तर अरबाजशीही माझे खूप चांगले संबंध आहेत, असे मलायका म्हणाली.