Tumbbad 2 Villain | तुंबाड २ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्नाची एन्ट्री? हस्तरच्या गुपिताचा उलगडा करण्यासाठी येणार मोठे स्टार्स?

'तुंबाड २' च्या कास्टिंगबाबत मोठी अपडेट; सोहम शाहसोबत स्क्रीन शेअर करणार 'हे' दोन बॉलिवूड दिग्गज?
tumbbad 2
Tumbbad 2 Villain casting updates instagram
Published on
Updated on
Summary

भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'तुंबाड' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. सोहम शाहने हस्तरच्या परत येण्याचे संकेत दिल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच आता या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांसारखे कसलेले अभिनेते दिसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. जर हे कास्टिंग फायनल झाले, तर 'तुंबाड २' हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा 'डार्क फॅन्टसी' चित्रपट ठरू शकतो.

tumbbad-2 casting nawazuddin siddiqui akshaye khanna role

तुंबाड ओरिजिनल चित्रपटाने प्रचंड प्रेक्षक वर्ग खेचून आणला होता. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. नंतर चर्चा सुरु झाली ती दुसऱ्या भागाची. मुळच्या तुंबाडच्या सीक्वेलमध्ये मुख्य खलनायकाची भूमिका कोण साकारणार, यावर चर्चा सुरु झाली. यासाठी बॉलिवूडचे दोन स्टार्स अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची नावे समोर आली. दुसरीकडे सोहम शाहने त्याच्या इन्स्टाग्रामवर नवाजुद्दीनचा एक फोटो शेअर केल्यानंतर नवाजची भूमिका यात पक्की झाल्याचे म्हटले गेले. आता खरी चर्चा सुरु झाली म्हणजे खलनायकाची.

रिपोर्टनुसार, निर्मात्यांना खलनायकाचा प्रभावी अभिनय पडद्यावर आणायचा आहे. हा सिक्वेल सोहम शाह आणि 'पेन स्टुडिओज' निर्मित करत आहेत. ‘तुम्बाड २’ चे दिग्दर्शन आदेश प्रसाद यांनी केले असून, सोहम शाह फिल्म्स या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे.

tumbbad 2
Riteish Deshmukh rules in own house | रितेश देशमुखने जेनेलियासाठी ठेवलेत 'हे' खास नियम; मुलेही म्हणतात- 'बाबा आता बस...'

तुंबाड २ चे शूटिंग सुरू

‘तुंबाड २’ च्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती समोर आलीय. चित्रपटाच्या टीमने मुंबईत ‘मुहूर्त शॉट’ घेऊन सुरुवात केली आहे. या चित्रपटात सोहम शाह मुख्य भूमिकेत आहे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मुहूर्तवेळी निर्माते डॉ. जयंतीलाल गाडा, धवल गाडा, बोनी कपूर आणि टुटू शर्मा हे उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे.

तुंबाड २ कास्टिंग: 'तुंबाड २' मधील एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नकारात्मक भूमिकेसाठी अक्षय खन्नाचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

निर्मिती:

रिपोर्टनुसार,मूळ चित्रपटाचे बजेट केवळ ५ कोटी रुपये होते, त्या तुलनेत या सिक्वेलचे बजेट १५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

tumbbad 2
Disha Vakani Father Bhim Vakani dies|'तारक मेहता...' फेम दिशा वकानीच्या वडिलांचे निधन; मालिकेत साकारली होती ही महत्त्वाची भूमिका!

भूमिका काय असतील?

खलनायकाची ही भूमिका एका निर्दयी दुष्टाची असल्याचे म्हटले जात आहे. ही भूमिका लोभ आणि पौराणिक कथांच्या आधारावर उभारलेल्या कथेवर असेल. सध्या चर्चा सुरू असली तरी, अंतिम कास्टिंग बाबतच्या अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

हस्तरचे गूढ उलगडणार?

२०१८ मध्ये मूळचा चित्रपट रिलीज झाला होता. 'तुंबाड' चित्रपटाने गूढ जगाची ओळख करून दिली होती. हस्तरची कथा आणि विनायक रावचा लोभ आजही असणार का? यातूनच हस्तरचे गूढ उलगडणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. आता सहा वर्षांनंतर निर्मात्यांनी 'तुंबाड २' ची तयारी सुरू केली असून, या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत कोणती अपडेट येत, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news