पुढारी ऑनलाईन डेस्क - मैं हू ना फेम अभिनेता जायद खानने एका पॉडकास्टमध्ये आपल्या लग्नाबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. पत्नी मलायका पारेखशी लग्नावेळी त्याने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सात फेरे घेतल्याचे सांगितले. तो म्हणाला की, ते एक ग्रँड वेडिंग होते पण गुपचुपपणे लग्ने केले होते. हे सीक्रेट ठेवलं होतं. याबद्दल मोजक्या मित्र मंडळी आणि नातेवाईकांना माहिती होतं. २००५ मध्ये त्याने इंटरफेथ मॅरेज केलं होतं. आता त्याला दोन मुले आहेत.
पॉडकास्टमध्ये जायद खान आपल्या लग्नाबद्दल म्हणाला, 'मी याआधी लग्नाविषयी कधीच सांगितले नव्हते. आमच्या लग्नाच्या गेस्ट लिस्टमध्ये २ हजार नावे होती. आम्ही केवळ ३० मित्रांना फोन करून सांगितले की, आम्ही गोवाच्या ताज विलेज जात आहोत. तिथे सर्वांसाठी एक सरप्राईज आहे.'
जायद खानने पुढे सांगितलं की, 'खूपच चांगली व्यवस्था मलायकाने केली होती. फेरे आणि पंडितची व्यवस्था होती. गोवामध्ये ताज विलेजमध्ये आम्ही लग्नाच्या आधीच लग्ने केले होते. आम्ही सात फेरे घेतले आणि हे एक खूप प्रेमळ डेस्टिनेशन वेडिंग होतं. आम्हाला वास्तवात हे लग्न स्मरणीय बनवायचं होतं. आम्हाला मौज मस्ती करायची होती. ऑफिशियल लग्नापूर्वी आम्ही विवाहबद्द होतो.'
'मैं हूं ना' फेम जायद खान म्हणाला, आमचे कुटूंब प्रत्येक सण साजरा करते. आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. पण आम्ही प्रश्न उपस्थित करत नाही. मला अद्यापही आठवते की, मला हिंदू संस्कृती माहिती नव्हती. मी मलायकाला म्हटलं की, तिने सांगावे तसे मी लग्नाच्या विधी फॉले करेन.'