पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेतील अभिनेता हितेश भारद्वाज आणि भाविका शर्मा ही या मालिकेतील मुख्य पात्रे आहेत. हितेश भारद्वाज रजत ठक्करची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो. सावीची भूमिका भाविका शर्मा हिने आणि अमायरा खुराना हिने साईशा (साई) ही भूमिका निभावली आहे.
‘गुम है किसीके प्यार में’ मालिकेचे सद्यकथानक सावी, रजत आणि साई यांच्याभोवती फिरते. ज्यातून भावनिक गुंतागुंत अधोरेखित होते. ‘प्रोमो’मध्ये सुरुवातीला रजत गुजरातीत बोलून सावीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, तिला भाषा समजत नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर, तो तिच्याप्रति संवेदना व्यक्त करताना तिच्याशी मराठीतून बोलू लागतो. त्याने अवगत केलेल्या मराठी बोलण्याच्या कौशल्याबाबत सावीचा अभिप्राय काय आहे, याचा तो तिच्या अभिप्रायातून उत्सुकतेने शोध घेत असल्याचे दिसून येते. तरीही, तो तसे करण्याबाबत किती प्रामाणिक आहे, याबाबत जेव्हा सावी खेळकरपणे त्याला चिडवते, तेव्हा रजतचा मूड नाट्यमयरीत्या बदलतो. तिच्या हलक्याफुलक्या टोमण्यांनी तो तिच्यावर कमालीचा चिडतो. त्यामुळे सावीचे मन उद्ध्वस्त होते. यामुळे रागावर ताबा ठेवण्याच्या आणि त्यात बदल करण्याच्या रजतच्या क्षमतेविषयी प्रश्न निर्माण होतो. त्याचे औदासिन्य एक चांगली व्यक्ती होण्याच्या त्याचे प्रयत्न नेहमीच झाकोळून टाकते, यामुळे कदाचित तो स्वत:ला खलनायक म्हणून ठरवेल का? रजत आणि सावी यांच्यात जो बंध आहे, त्याची क्षमता ते कधी ओळखू शकतील का, की हे गैरसमज त्यांना सतत विलग ठेवतील?
‘स्टार प्लस’ वाहिनीवर रात्री ८ वाजता ‘गुम है किसीके प्यार में’ ही मालिका बघायला विसरू नका. या मालिकेची निर्मिती राजेश राम सिंग, पिया बाजपी, प्रदीप कुमार आणि शैका परवीन यांनी केली आहे.