

मुंबई -यशराज फिल्म्स (YRF) आणि प्रेमकथांचे बादशाह मोहित सूरी यांचं पहिलंवहिलं सहकार्य असलेली ‘सैयारा’ ही बहुप्रतीक्षित रोमँटिक चित्रपट आज टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटामधून यशराज फिल्म्स अहान पांडेला हिंदी सिनेमात लॉन्च करत आहे, तर त्याच्या जोडीला आहे अनीत पड्डा, जिने वेब सिरीज बिग गर्ल्स डोंट क्राई मधून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
टीझरमध्ये ‘सैयारा’ या शीर्षकाचा अर्थ समजावून सांगण्यात आला आहे. ‘सैयारा’ म्हणजे एखादं भटकतं आकाशीय पिंड. पण काव्यांमध्ये याचा उपयोग एखाद्या तेजस्वी, स्वप्नवत, आणि अप्राप्य व्यक्ती किंवा गोष्टीसाठी केला जातो—एक असं चमकदार तारा, जो नेहमी दिशा दाखवतो पण कधीही पूर्णपणे जवळ येत नाही.
मोहित सूरी, ज्यांचं सिनेमातलं २० वं वर्ष चालू आहे, याआधी आशिकी २, मलंग, आणि एक विलन यांसारख्या लोकप्रिय प्रेमकथा दिग्दर्शित केल्या आहेत. ‘सैयारा’ १८ जुलै २०२५ रोजी जगभरातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.