Surveen Chawla Casting Couch |'अन्‌ दिग्दर्शकाने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला..' कास्टींग काउचवर सुरवीनचे धक्कादायक खुलासे

Surveen Chawla | 'अन्‌ दिग्दर्शकाने चुंबन घेण्याचा केला प्रयत्न..मी त्याला धक्का दिला'..कास्टींग काउचवर सुरवीनचे धक्कादायक खुलासे
image of Surveen Chawla
Surveen Chawla On Casting Couch and Body Shaming Instagram
Published on
Updated on

Surveen Chawla On Casting Couch

मुंबई - बोल्ड अभिनेत्री सुरवीन चावलाने तिला आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. क्रिमिनल जस्टिस ४ फेम अभिनेत्री सुरवीन म्हणाली की, एका दिग्दर्शकाने तिच्यासोबत असभ्य वर्तन केलं होतं. क्रिमिनल जस्टीस ४ मुळे सुरवीन चावला चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, मुंबईमध्ये तिला कास्टिंग काउचला सामोरं जावं लागलं होतं.

दिग्दर्शकाने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला

सुरवीनने सांगितलं की, एका दिग्दर्शकाने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती नवविवाहिता होती आणि हे माहिती असूनदेखील दिग्दर्शकने तिच्या सोबत असे वर्तन केले होते. सुरवीनने सांगितलं की, "वीरा देसाई रोड वरील आपल्या ऑफिसमध्ये एका मीटिंगनंतर तिला किस करण्याचा प्रयत्न केला होता. ती म्हणाली- त्याच्या केबिनमध्ये मी माझ्या लग्नाबद्दल माहिती दिली होती. त्यान हे देखील विचारलं की, माझे पती कसे आहेत. पम जेव्हा मी तेथून जाऊ लागले तेव्हा तो दरवाजाजवळ किस करण्यासाठी वाकला. पण मी त्याला धक्का दिला आणि तेव्हा शॉक्ड होऊन तेथून निघून गेले."

image of Surveen Chawla
Kamal Haasan Kannada Controversy | 'जर मी चुकीचा नसेन तर माफी नाही मागणार', कन्नड भाषा वादावर कमल हासन यांची स्पष्टोक्ती

साऊथच्या दिग्दर्शकाने केली होती घाणेरड मागणी

सुरवीनने साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतील असाच आणखी एक कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव शेअर केला. सुरवीनने सांगितलं की, साऊथचा एका दिर्ग्शकाला इंग्रजी किंवा हिंदी बोलायला येत नव्हतं. त्याने आपल्या मित्राच्या माध्यमातून एक घाणेरडी मागणी केली. हे ऐकून तिला धक्का बसला होता.

image of Surveen Chawla
Sudesh Mhashilkar | 'शांत बसणं मला शक्य झालं नाही..' प्राचीच्या गंभीर आरोपांवर अखेर सुदेश म्हशीलकरांनी सोडलं मौन

बॉडी शेमिंगवर काय म्हणाली सुरवीन चावला?

ऑडिशन दरम्यानच्या बॉडी शेमिंगवर मुलाखतीत सुरवीनन सांगितले की, कशा प्रकारे महिलांना नेहमी वेगवेगळ्या गोष्टींतून जावं लागतं. ती म्हणाली, "असं वाटतं की, ते तुम्हाला अनसेफ फील करवणं आपले काम समजतात. तुमचं वजन, तुमच्या कंबरेची साईज...प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित केले जातात."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news