Yogita Bihani | अर्चना पूरन सिंहच्या मुलाने 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्रीशी केला साखरपुडा; दोघांनी लगेच घेतला 'हा' मोठा निर्णय

Aryaman Sethi Engagement Yogita Bihani | अर्चना पूरन सिंहचा मुलगा आर्यमन सेठीने खास अंदाजात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज
iamge of Yogita Bihani-Aryaman Sethi
Aryaman Sethi Engagement Yogita Bihani Instagram
Published on
Updated on

Aryaman Sethi Engagement Yogita Bihani

मुंबई : अभिनेत्री अर्चना पूरन सिंह यांचा मुलगा आर्यमन सेठीने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. गर्लफ्रेंड योगिता बिहानीला त्याने खास अंदाजात प्रपोज केले, याचे फोटोज व्हायरल होत आहेत. अर्चना पूरन सिंह या कपिल शर्माच्या शोच्या जज म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा मुलगा आर्यमन सेठीने 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री योगिता बिहानीशी साध्या पद्धतीने साखरपुडा केला. त्याची झलक आर्यमनने आपल्या लेटेस्ट व्लॉगमध्ये दाखवलीय. तर योगितानेही इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.

iamge of Yogita Bihani-Aryaman Sethi
Border 2 First Look | 'खांद्यावर तोफ, डोळ्यात आग...' शत्रूला धडकी भरवणारा सनी देओलचा 'बॉर्डर' लूक

आर्यमन सेठीचे युट्यूब चॅनल असून त्यावर तो आपल्या डेली लाईफचे रूटीन शेअर केले आहे. नुकताच त्याने व्लॉगमध्ये सांगितले आहे की, त्याने योगिताशी साखरपुडा केला. या व्हिडिओची सुरुवात आर्यमन आणि योगिता यांच्या घोषणेने होते. ज्यामध्ये ते म्हणतात की, 'आम्ही लिविंगमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. वाटत आहे की, आम्ही मोठे झालो आहोत...'

घराची चावी देऊन योगिताला केलं प्रपोज

आर्यमन सेठी आपल्या होणाऱ्या पत्नी सोबत बंगल्याजवळील एका घरात राहणारे आहेत. त्याने त्याच्या घराची झलक देखील व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. या दरम्यान, परमीत सेठी आणि अर्चना पूरन सिंह सोबत ते दिसले. नवं घर पाहून योगिता देखील खूप खुश दिसली. ती म्हणाली की, 'माझी नेहमीच इच्छा होती की, सोबत गार्डन असावं..'

iamge of Yogita Bihani-Aryaman Sethi
Actor Darshan Arrested | रेणुकास्वामी हत्या प्रकरणात अभिनेता दर्शनला झटका; सुप्रीम कोर्टाने जामीन रद्द करताच अटकेची कारवाई

योगिता सोबत लिव्ह इनमध्ये

आर्यमनने गुडघ्यावर बसून फुलासोबत घरची चावी योगिताला देताना व्हिडिओमध्ये दिसतो. तो योगिताला विचारतो की, 'माझ्याशी लग्न करशील?' यावर योगिताने हो म्हटलं आणि एकमेकांनी आलिंगन दिलं. मग आर्यमनने योगिताच्या हातात घराच्या चावीचा छल्ला घातला आणि म्हटलं की, ही आहे तुझी अंगठी आणि हे तुझं घर...'

मुलाची ही गोष्ट ऐकून अर्चना पूरन सिंह देखील भावूक होताना दिसल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news