

Actor Darshan Arrested Renukaswamy murder case
नवी दिल्ली : रेणुकास्वामी हत्या प्रकरणात कन्नड अभिनेता दर्शनला मोठा दणका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन नाकारला असून त्याला आज गुरुवारी अटक करण्यात आलीय. दर्शनला बंगळुरुतील होसाकेरेहल्ली येथील त्याची पत्नी विजयलक्ष्मीच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला अटकेपासून बचाव करायचे होते आणि कोर्टात आत्मसमर्पण करायचे होते, अशी माहिती समोर आलीय.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दर्शन घरात थांबल्याची सूचना पोलिसांना मिळाली आणि त्याला तिथून अटक करण्यात आली. तसेच त्याची मैत्रीण, अभिनेत्री पवित्रा गौडादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे.
न्यायमूर्ती जे बी पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन (Justices JB Pardiwala and R Mahadevan) यांच्या खंडपीठाने कर्नाटक हायकोर्टाचे आदेश हे सांगत नाकारले की, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. खंडपीठाने म्हटले की, "आम्ही जामीन देणे आणि रद्द करणे.. या प्रत्येक गोष्टीवर विचार केला. हे स्पष्ट आहे की, हायकोर्टाच्या आदेशात अनेक त्रुटी आहेत."
'आरोप आणि फॉरेन्सिक पुरावे पाहता जामीन रद्द करण्यासाठी पुष्टी मिळते. यासाठी याचिकाकर्त्याचे जामीन रद्द केलं जात आहे.' दर्शन आणि सह-आरोपींना जामीन देण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या अपीलावर हा निर्णय देण्यात आला.
मीडिया रिपोर्टनुसार, सुप्रीम कोर्टाने म्हटले की, 'लोकप्रियता किती असो, कायद्यासमोर सर्वजण समान आहेत.' त्यानंतर दर्शन आणि अन्य आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले.
एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना, राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे वकील डीएल चिदानंद म्हणाले की, 'कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय जामीन देण्याच्या तत्त्वांचे पालन करत नाही. देशात कायद्याचे राज्य कायम आहे आणि एखादी व्यक्ती कितीही लोकप्रिय असली तरी, त्यांना कायद्यानुसार वागवले पाहिजे,' असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
दर्शनवर अभिनेत्री पवित्रा गौडा आणि अन्य लोकांवर रेणुकास्वामी नावाच्या एका फॅनचे अपहरण आणि त्याचा छळ केल्याचा आरोप आहे. रेणुकास्वामीने तथाकथितपणे पवित्राला अश्लील संदेश पाठवल्याचे म्हटले जाते.
पोलिसांनी आरोप केला की, पीडितला जून २०२४ मध्ये तीन दिवस बंगळुरुमध्ये एका शेडमध्ये ठेवण्यात आलं, त्याला त्रास देण्यात आला. नंतर त्याचा मृतदेह एका नाल्यात सापडला. राज्य सरकारच्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने २४ जानेवारी रोजी अभिनेता, गौडा आणि इतरांना नोटीस बजावली होती.
९ जून २०२४ रोजी बेंगळुरूमधील सुमनहल्ली येथील एका अपार्टमेंटजवळ नाल्याजवळ रेणुकास्वामीचा मृतदेह आढळला होता.