पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांनी अलीकडेच भारतीय रॅपर आणि हिप हॉप कलाकार यो-यो हनी सिंगच्या जीवनावर आधारित फीचर फिल्मवरील मुख्य शूट पूर्ण केलं आहे. शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी स्टारर ह्यूमन ही सुपर यशस्वी वेब सिरीज तयार केल्यानंतर या दिग्दर्शकाने त्याच्या दूरदृष्टीने या प्रोजेक्टचे शूट संपूर्ण केलं.
दिग्दर्शकाला या माहितीपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, "या माहितीपटावर काम करणे हा माझ्यासाठी सर्वात आनंददायी अनुभव होता. योयो हनी सिंगचे जग म्हणजे रोलर कोस्टर राईड ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात क्रिएटिव्ह राईड आहे आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंगचा पहिला अनुभव आहे. या अप्रतिम संगीतमय साहसात माझ्यासोबत काम केल्याबद्दल मी सिख्या एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सचा सदैव आभारी आहे."
याचा टीझर आधीच आऊट झाला असून ही डॉक्युमेंटरी ओटीटी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. या डॉक्युमेंटरी व्यतिरिक्त दिग्दर्शक मोझेझ सिंग लवकरच त्याच्या पुढील फीचर फिल्मवर काम करण्यास सुरुवात करणार असल्याचं समजतंय.