यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची आणि लवंगी मिरची २ मालिका भेटीला

शिवानी बावकर
शिवानी बावकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी वर १३ फेब्रुवारीपासून 'यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची' आणि 'लवंगी मिरची' या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. "यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची" ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अशा आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं. या मालिकेची निर्मिती केली आहे पिकोलो फिल्म्सने (वीरेन प्रधान). या आधी वीरेन प्रधान यांची उंच माझा झोका ही मालिका झी मराठीवर खूप गाजली होती. तर "लवंगी मिरची" ही मालिका एका डॅशिंग मुलीची आहे जी अन्याया विरुद्ध आवाज उठवतेय, आपल्या आईला हक्क मिळवून देण्यासाठी लढतेय.

या मालिकेची निर्मिती केलेय रुची फिल्म्स (संगीत कुलकर्णी). संगीत कुलकर्णी यांच्या अस्मिता आणि शुभंकरोती या मालिका झी मराठीवर गाजल्या आहेत. या मालिकेतून लागीर झालं जी फेम शीतली म्हणजेच शिवानी बावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news