यामी गौतमचा ‘Article 370’, ‘कॅक’ची चांगली सुरुवात

Article 370 Review
Article 370 Review

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या बॉलिवूडला पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत, असे दिसते. अॅनिमनलच्या छप्पर फाडके यशाने बऱ्याच दिवसांनी ब्लॉकबस्टर मिळाला होता. आता अन्यही अनेक चित्रपटांना यांगले यश मिळू लागले आहे. यामी गौतम आणि विद्युत जामवाल यांसापरख्या कलाकारांसाठीही हा शुक्रवार आनंद घेवून आला आहे. ( Article 370 )

संबंधित बातम्या

२३ फेब्रुवारी रोजी त्यांचे दोन्ही चित्रपट 'आर्टिकल ३७०' ( 'Article 370 ) आणि 'कॅक' थिएटरमध्ये भिडले, असे असूनही दोन्ही चित्रपटांनी पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. 'आर्टिकल ३७०' ने पहिल्या दिवशी ५ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई करली होती, तर 'क्रेक'ने पहिल्या दिवशी ४ कोटी रुपयांची कमाई केली.

'आर्टिकल ३७०' हा यामीचा एक मुख्य अभिनेत्री म्हणून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे, तसे पाहिले, तर तिच्या कारकिर्दीतील हा सर्वोनम ओपनर चित्रपट नाही. तरीही या चित्रपटाचा संपूर्ण भार यामीच्या खांद्यावर होता, अशा परिस्थितीत चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५.७५ कोटींची कमाई करणे, ही मोठी कामगिरी आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. पहिल्या दिवशी एकूण ३०.८२ टक्के ऑक्युपन्सी मिळाली,

विद्युत जामवाल, नीरा फतेही आणि अर्जुन रामपाल स्टार स्पोर्टस् अॅक्शन-अॅडव्हेंचर 'कॅक'लाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी एकूण २०.५८ टक्के ऑक्युपन्सी मिळाली. आदित्य दत्त दिग्दर्शित हा देशातील पहिलाच अत्यंत स्पोर्टस् अॅक्शन चित्रपट आहे,

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news