Samantha Ruth Prabhu : हिरवा निर्सग अन् पाण्यात हॉट समंथा; मलेशिया ट्रिपचे फोटो | पुढारी

Samantha Ruth Prabhu : हिरवा निर्सग अन् पाण्यात हॉट समंथा; मलेशिया ट्रिपचे फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सध्याच्या सर्वात आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे नयनतारा, रश्मिका मंदाना आणि समंथा रूथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) ही ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंटवा’ गाण्यामुळे उत्तर भारतातही घराघरांत पोहोचली, २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाद्वारे समंधाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आणि ती एक लोकप्रिय अभिनेत्री ठरली.

संबंधित बातम्या 

Samantha Ruth Prabhu च्या अभिनयातील कामगिरीसाठी अनेकदा तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळालेला आहे. नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य याच्याशी तिचा विवाह झाला होता; पण काही वर्षांमध्येच दोघांनी घटस्फोट घेतला. समंथाने सध्या अभिनय क्षेत्रापासून विश्रांती घेतली असून, मलेशियामध्ये ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. या ट्रिपचे फोटोज तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

तपकिरी रंगाच्या बिकिनीवर समंधाचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय, निसर्गाचा आनंद घेत समंथा क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. आजूबाजूची हिरवळ, गर्द झाडीतले घर, सुंदर कमळ असे नैसर्गिक सौंदर्य टिपणारे क्षण समंथाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या निसर्गरम्य वातावरणात ती मेडिटेशन करतानाही दिसत आहे. ‘हायेस्ट लव्ह’ असे कॅप्शन देत समंथाने हे फोटोज शेअर केले आहेत. समंथा ऑटो इम्युन कंडिशन (मायोसिटिस) नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. हा एक त्वचेचा आजार आहे. ज्यामुळे इतर अनेक समस्यांसह स्नायू दुखतात. अनेक महिन्यांपासून या आजारावर ती उपचार घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button