

alia bhatt changes her name as Alia Kapoor
सोशल मिडियावर सध्या आलिया भट्ट की कपूर या दोहोंची चर्चा जोरात सुरू आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नाला बराच काळ झाला असला तरी अलियाने आपले नाव न बदलता भट्टच ठेवले आहे. पण अगदी अलीकडेच पुन्हा एकदा ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे अचानक व्हायरल झालेला फोटो. आपल्या एका व्लॉगमध्ये आलिया आपल्या हॉटेलमधील खोलीत उभी असते. तिच्या मागे असलेल्या नोटमध्ये तिचा उल्लेख आलिया कपूर असा केला आहे.
यावरून अलियाने आपले नाव बदलले असल्याची चर्चा नेटीझन्सनी सुरू केली आहे. पण याच्या उलट मात्र सोशल मिडियावर आलियाने आपले आडनाव भट्टच ठेवले आहे. चाहत्यांना अधिक गोंधळात न टाकता तिने यावर खुलासाही केला आहे. मिड डेला दिलेल्या एका इंटरव्हयु मध्ये तिने सांगितले की तिचे स्क्रीन नाव कायमच आलिया राहील तर पेपरवर तिचे नाव मात्र कपूर राहील.
यावर नेटीझन्सही भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत. एक युझर लिहिते 'तू माझ्यासाठी कायमच आलिया भट्ट राहशील. पण तुझ्या नावात एक वजन आले आहे. आता हे एक ब्रॅंड नेम झाले आहे.’
तर दूसरा म्हणतो, मला वाटले तुझे आधीच नाव आलिया भट्ट कपूर आहे. तिने स्वत:च याचा खुलासा कॉफी विथ कारणमध्ये केला होता. रणबीर नक्कीच खुश होईल. वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर आलिया आता अल्फा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.