डिजिटल जगात मीम्स बनवणारे atheist कृष्णा यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. बुधवारी पहाटे 4.30 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते न्यूमोनियाने आजारी होते. त्याच्या अचानक जाण्याने सोशल मिडियावरील त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
कृष्णाच्या कलेची ओळख त्याच्या फोटोतून व्हायची. तो जुने, धुरकट आणि काळाच्या ओघात जुन्या झालेल्या फोटोना जीवंत रूप देण्याचे कसब कृष्णाला साधले होते. त्याच्या या कौशल्याने त्याला इतरांपासून वेगळे केले होते.
कृष्णा यांच्या कामाचा परीघ केवळ फोटो एडिटिंगपर्यंतच सीमित नव्हता तर त्याच्या मिम्समधला ह्युमर अनेकांना आवडायचा. लहान मूलापासून प्रौढ व्यक्तिपर्यंत प्रत्येकालाच त्याचे मिम्स आवडायचे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आणि अभिनेता अक्षय कुमारदेखील त्याचे फॅन बनले होते.
एका व्हीडियोमध्ये अक्षय कुमारने हा उल्लेख केला होता की कृष्णाने बनवलेले एक मीम त्याने पंतप्रधान मोदी यांना दाखवले होते. अक्षयने कृष्णाचे कौतुक करताना म्हणले होते की त्याच्या कलेतील प्रामाणिकपणा आणि साधेपणाने पूर्ण असलेली कॉमेडी लोकांना खूप आवडते आहे. त्याने असेच लोकांना हसवत राहावे.
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनीही अक्षयचे ते ट्वीट रीट्वीट करत स्वत:ला या मीममध्ये पाहणे मजेशीर असल्याचे म्हणले होते
कृष्णा हे खूप दिवस आजारी होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. याच दरम्यान त्याला न्यूमोनीया झाला. त्यामुले त्याची तब्येत अजून बिघडली. कृष्णा देखील या आजाराच्या परिणामांना जाणून होता. तो स्वत: अनेकदा म्हणायचे की जर मी जगलो तर तो चमत्कारच असेल. पण दुर्दैवाने हा चमत्कार घडू न शकल्याचे त्याचे निकटवर्तीय म्हणत आहेत.
रुपाली गांगुलीने x या सोशल प्लॅटफॉर्मवर कृष्णा याला श्रद्धांजली वाहिली आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘ कृष्णा केवळ विजुयल सटायर मास्टर नव्हते तर ते व्यंग आणि हास्याचा उत्तम आविष्कार करणारी भावना होते. त्यांच्या फोटोशॉप जोकसनी आम्हाला हसवले आहे. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. तुमची आठवण येईल ओम शांती