मोहित सूरी दिग्दर्शित सैयारा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. पाचव्या दिवशीही या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. हा सिनेमा पाहताना अनेकजण ढसाढसा रडल्याचे व्हीडियोही व्हायरल होत आहेत. रिलीज झालेल्या दिवसापेक्षा सैयाराची पाचव्या दिवसाची कमाई जास्त आहे. या नवोदित कलाकारांच्या सिनेमाने सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, राजकुमार राव यासारख्या कलाकारांच्या सिनेमालाही मागे टाकले आहे.
सैयारा 8 जुलैला थिएटरवर रिलीज झाला आहे. कोणत्याही खास प्रमोशनशिवाय रिलीज झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. 100 कोटी क्लबमध्ये अलीकडेच आलेल्या या सिनेमाने आतापर्यंत 132 कोटी रुपये कमावले आहेत. रिलीजदिवशीच या सिनेमाने 21 कोटींचा गल्ला जमवला आहे. इतकेच कशाला वीकएंड नसतानाही या सिनेमाने केलेली कमाई आश्चर्यचकित करणारी आहे.
sacnik ने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन सैयाराचे पाचव्या दिवसाचे कलेक्शन 25 कोटी रुपये इतके आहे. तर पहिल्या सोमवारी 24 कोटी कमावले होते. अजून या कमाईत भर होतच आहे. अर्थात या आठवड्यातही या सिनेमाच्या कमाईमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण या आठवड्यात सैयाराच्या स्पर्धेला कोणताच सिनेमा रिलीज होणार आहे.
सैयाराच्या वादळाचा धसका घेऊन सन ऑफ सरदार 2 च्या मेकर्सने रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे.
सैयाराने जाट आणि केसरी चॅप्टर 2 चा रेकॉर्ड मोडला आहेच. याशिवाय अक्षय कुमारच्या स्काय फोर्स (112 कोटी ), सलमान खान (110 कोटी रुपये) यांना मागे टाकले तसेच आशिकी 2च्या लाईफटाइम कलेक्शनलाही या नव्या रोमॅंटिक सिनेमाने मागे टाकले आहे.
सैयाराचे बजेट जवळपास 15 कोटी रुपये होते. पण या सिनेमाने त्याचे निर्मितीमूल्य पहिल्या दिवशीपासूनच वसूल केले आहे. या सिनेमाने जगभरात 110 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा डेब्यू असलेला हा सिनेमा मोहित सूरीने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाच्या रोमॅंटिक प्लॉटने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या सिनेमात अहान एका गायकाच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे तर अनीत एका गीतकारच्या रूपात दिसते आहे.