Who Is Javier Bardem: ऑस्कर मंचावरून ‘Free Palestine’चा नारा देणारा जेवियर बार्डेम कोण आहे? का होतेय चर्चा?

Javier Bardem Oscars 2026: ऑस्कर सोहळ्यात स्पॅनिश अभिनेता जेवियर बार्डेम यांनी मंचावरून ‘No To War, Free Palestine’ असा मेसेज दिला. प्रियंका चोप्रासोबत पुरस्कार सादर करताना त्याने युद्धविरोधी भूमिका मांडली.
Who Is Javier Bardem
Who Is Javier BardemPudhari
Published on
Updated on

Javier Bardem Oscars 2026: ऑस्कर २०२६ पुरस्कार सोहळ्यानंतर अनेक चित्रपट आणि विजेत्यांबद्दल चर्चा सुरू असताना एका अभिनेत्याचे नाव अचानक चर्चेत आले आहे. हा अभिनेता म्हणजे स्पॅनिश कलाकार जेवियर बार्डेम. त्याने पुरस्कार जिंकल्यामुळे नव्हे, तर ऑस्करच्या मंचावरून केलेल्या एका वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे.

९८ व्या Academy Awards सोहळ्यात बार्डेमला अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ पुरस्कार सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या श्रेणीतील पुरस्कार नॉर्वेच्या Sentimental Value या चित्रपटाला मिळाला. मात्र विजेत्याचे नाव जाहीर करण्यापूर्वी बार्डेमने मंचावरून एक मेसेज दिला.

मंचावर येताच त्याने “No To War, Free Palestine” म्हणजेच “युद्धाला नकार द्या, पॅलेस्टाइनला स्वातंत्र्य द्या” असे आवाहन केले. या वक्तव्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. त्याचा हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

जेवियर बार्डेम कोण आहे?

जेवियर बार्डेम हा स्पेनमधील प्रसिद्ध अभिनेता असून त्याचा जन्म १ मार्च १९६९ रोजी स्पेनमधील कॅनरी आयलंड्स येथे झाला. त्याने १९९० साली Las edades de Lulú या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर १९९२ मध्ये आलेल्या Jamón, Jamón या चित्रपटामुळे त्याला ओळख मिळाली.

पुढे त्याने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या प्रभावी अभिनयामुळे हॉलीवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली.

Who Is Javier Bardem
Raajneeti Sequel | 'राजनीति'वर मोठं अपडेट, प्रकाश झा यांनी घेतला मोठा निर्णय! म्हणाले, सीक्वल तर करूनच...'

सामाजिक मुद्द्यांवरही ठाम भूमिका

अभिनेता असण्यासोबतच बार्डेम हा सामाजिक मुद्द्यांवरही स्पष्टपणे भूमिका मांडणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने यापूर्वीही गाझामधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि हिंसाचाराविरोधात आवाज उठवला होता.

ऑस्कर सोहळ्यात तो ज्या सूटमध्ये आला होता त्यावरही त्याने दोन बॅज लावले होते. एका बॅजवर “Palestine” असे लिहिले होते, तर दुसऱ्यावर “No a la guerra” म्हणजेच “युद्धाला नकार” असा मेसेज होता.

Who Is Javier Bardem
Shreya Ghoshal: अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषालही ब्रेक घेणार? वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ

सोशल मीडियावर चर्चा

ऑस्करच्या मंचावरून दिलेल्या या मेसेजमुळे जेवियर बार्डेम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही लोकांनी त्याच्या धाडसी वक्तव्याचे कौतुक केले, तर काहींनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. या घटनेमुळे ऑस्करच्या मंचावरून राजकीय आणि मानवी प्रश्नांवर बोलण्याच्या परंपरेबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news