Raajneeti Sequel | 'राजनीति'वर मोठं अपडेट, प्रकाश झा यांनी घेतला मोठा निर्णय! म्हणाले, सीक्वल तर करूनच...'

Raajneeti Sequel | 'राजनीति'वर मोठं अपडेट, प्रकाश झा यांनी घेतला मोठा निर्णय! म्हणाले, सीक्वल तर करूनच...'
katrina kaif-ranbir kapoor
Raajneeti Sequel latest updates instagram
Published on
Updated on
Summary

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजनीति’ या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल तयार होणार असल्याचं दिग्दर्शक प्रकाश झा यांनी स्पष्ट केलं आहे. ‘राजनीति 2’साठी सध्या स्क्रिप्ट आणि इतर तयारी सुरू असून या बातमीमुळे चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. राजकारण आणि सत्तासंघर्षाची कथा पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

raajneeti-2 update prakash jha confirms sequel

२०१० मध्ये प्रदर्शित झालेला Raajneeti हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या राजकीय चित्रपटांपैकी एक मानला जातो. आता या चित्रपटाच्या सीक्वलबाबत मोठी माहिती समोर आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक Prakash Jha यांनी ‘राजनीति 2’बाबत मोठा खुलासा केला आहे.

katrina kaif-ranbir kapoor
Kritika Kamra Wedding Reception | व्हाईट ड्रेसमध्ये कृतिकाचा स्टनिंग लूक, गौरव कपूरसोबत दिले एकापेक्षा एक फोटो पोझ

एका मुलाखतीत बोलताना प्रकाश झा यांनी सांगितले की, ‘राजनीति २’वर ते सध्या काम करत आहेत. राजकारण हा सतत चालणारा प्रवास असल्याने या कथेला पुढे नेण्याची कल्पना त्यांच्या मनात आधीपासूनच होती. त्यामुळे आता या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रकाश झा म्हणाले की, 'राजनीति वर काम करत आहे. हे प्री प्रोडक्शन स्टेजवर आहे'

चित्रपट निर्माते प्रकाश झा यांनी पुष्टी केली की, ते आपल्या २०१० चा थ्रिलर 'राजनीति' सीक्वलवर काम करत आहेत. एका मुलाखतीत प्रकाश झा यांनी सांगितले की, रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ स्टारर चित्रपटाचे सिक्वेलचे सध्या प्री-प्रॉडक्शन सुरू आहे. मी त्यावर सातत्याने काम करत आहे.

katrina kaif-ranbir kapoor
Not love jihad : Mahakumbh girl Monalisa | ट्रोल झाल्यानंतर मोनालिसा स्पष्टच म्हणाली, 'लव्ह जिहाद नाही; प्रत्येक धर्माचा आदर..'

मुळचा चित्रपट 'राजनीती २' हिट ठरला होता. सिनेप्रेमी त्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची गेल्या बऱ्याच काळापासून आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. दुसरीकडे, मुळच्या चित्रपटातील कलाकार रणबीर कपूर, कॅटरीना कैफ, अर्जुन रामपाल आणि इतर कलाकार सीक्वल मध्ये पुन्हा दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 'राजनीती' हा चित्रपट एकाच कुटुंबातील कटू राजकारणावर आधारित होता.

सीक्वलविषयी निर्माते म्हणाले की, त्यावेळी त्यांनी सर्वोत्कृष्ट काम केलं होतं. यात कोणतीच शंका नाही की, एक अभिनेता, लेखक वा दिग्दर्शकाच्या रूपात, जेव्हा मी माझं काम पुन्हा पाहतो, तेव्हा नेहमी वाटतं की, तुम्ही आणखी उत्तम करू शकता. काळानुसार, परिस्थिती बदलते. रणबीरने ही खूप चांगलं काम केलं होतं.

प्रकाश झा यांनी 'राजनीति' सीक्वलची घोषणा जून २०२५ मध्ये कली होती. प्रकाश झा यांनी एका वेबसाईटला माहिती दिली की, कास्टिंग आणि शूटिंग बद्दल आणखी काही निश्चित झालेले नाही. सध्या मी चित्रपटावर काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news