Mahesh Mote Toll Plaza Controversy: टोल नाक्यावर नेमकं काय घडलं? महेश मोटेंनी पहिल्यांदाच सांगितलं व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

Mahesh Mote Toll Plaza Controversy: टोलनाका वादानंतर महेश मोटे यांनी प्रथमच या घटनेबाबत खुलासा केला आहे. त्या दिवशी वैयक्तिक तणाव आणि भावनिक अस्थिरतेमुळे मी संतापलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Mahesh Mote Toll Plaza Controversy
Mahesh Mote Toll Plaza ControversyPudhari
Published on
Updated on

Mahesh Mote Toll Plaza Controversy Video Viral: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या टोलनाका वादानंतर कंटेंट क्रिएटर महेश मोटे यांनी प्रथमच या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. व्हायरल व्हिडिओमागची पार्श्वभूमी, त्यावेळची मानसिक अवस्था आणि नेमकं काय घडलं होतं, याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

महेश मोटे यांनी सांगितलं की, टोलनाक्यावर घडलेली घटना ही केवळ त्या क्षणापुरती नव्हती. त्याआधी काही वैयक्तिक गोष्टींमुळे ते मानसिक तणावात होते. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर झाला.

"त्या दिवशी घरातील काही वैयक्तिक गोष्टींमुळे मी आधीच अस्वस्थ होतो. त्या विचारांतूनच मी टोलनाक्यावर पोहोचलो. तिथे संबंधित कर्मचाऱ्याने मला ओळखले नाही. कदाचित त्यावेळी माझा इगो दुखावला गेला असेल किंवा मी भावनिकदृष्ट्या अस्थिर अवस्थेत असेन," असे महेश मोटे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, त्या वेळी ते पूर्णपणे मानसिक स्थितीत नव्हते. त्यांनी आधी टोलनाका कर्मचाऱ्याला व्हिडिओ बनवण्याबाबत सांगितले होते. मात्र, त्यानंतर जे काही घडले ते एका क्षणिक भावनेतून आणि आतल्या दडपलेल्या भावनांच्या उद्रेकातून घडले.

"मी कॅमेरा सुरू करून गाडीतून खाली उतरलो आणि जे काही बोललो, ते पूर्वनियोजित नव्हते. तो एक भावनिक फ्लो होता. माझ्या मनात साचलेली निराशा, तणाव आणि हर्ट झाल्याची भावना त्या क्षणी बाहेर आली," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mahesh Mote Toll Plaza Controversy
Bab el Mandeb Crisis: जगाची अर्थव्यवस्थेला व्हेंटिलेटरवर जाणार; होर्मुझनंतर आता 'बाब-अल-मंदेब' बंद करण्याचा इराणचा इशारा

महेश मोटे यांच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. काहींनी त्यांच्या प्रामाणिक कबुलीचे स्वागत केले आहे, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी संयम राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, टोलनाक्यावरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महेश मोटे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता त्यांनी स्वतःची बाजू मांडत त्या घटनेमागील मानसिक आणि वैयक्तिक कारणांचा खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर या वादावर पडदा पडतो की नवी चर्चा सुरू होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news