

Sayali sanjeev on uddhav thackrey and Raj Thackrey
अभिनयात करियर करता करता राजकारणातही येण्याची इच्छा व्यक्त केली आहे अभिनेत्री सायली संजीव हिने. सुमन म्युझिक मराठी या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हे स्पष्ट केले. तुला राजकारणात रस आहे का असे विचारल्यावर ती म्हणते, मला राजकारणात यायची इच्छा आहे. अॅक्टिव पॉलिटिक्समध्ये यायचे आहे. नुसते व्हिजन व्हिजन करायचे नाहीये. जेव्हा आपण एखादी समस्या अनुभवतो, तेव्हा ती सोडवण्यासाठी यंत्रणेचा भाग होणं एकदा आपण अनुभवून बघूया यातून पॉलिटिक्सची आवड निर्माण झाली आहे. फक्त सिस्टिम आणि शासनाला नावे ठेवण्यापेक्षा आपण स्वत: का नाही हे करावे असे मला वाटते.
लोक राजकारण म्हणले की आठ्या आणतात पण राजकारण हे उत्तम करियर आहे. युवापिढीसाठी राजकारण अत्यंत चांगला करियर ऑप्शन आहे. अभिनय माझी आवड आहेच तसे राजकारण माझे पॅशन आहे. या करियरची सुरवातही मी केली आहे. मी मनसे चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे.
राज साहेबच का? यावर मी सांगू शकते, राज ठाकरे यांची विचारसरणी आवडते. राज साहेबांची पक्ष स्थापन केल्यानंतरची पहिली सभा माझ्या अजून लक्षात आहे. मी त्यावेळी दहावीत होते. मी ती सभा प्रत्यक्ष ऐकली होती. या सगळ्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पाडला. त्यामुळे जशी अठरा वर्षे पूर्ण झाली मी मनसेची सभासद झाले. राज साहेबांचा विविध विषयातील ज्ञानाचा आवाका पाहून मी थक्क झाले होते अजूनही आहे.
दोन्ही बंधुनी एकत्र यावे याबाबत मला नेमके काय हव आहे ते सांगता येणार नाही. पण महाराष्ट्राच्या हितासाठी जे कही असेल ते करायला हवे असे राज साहेब म्हणतात ते मलाही पटते आहे. मला आनंद होतो जेव्हा महाराष्ट्रात विकास होतो. मेट्रो सारखी यंत्रणा उभारली जाते. आपल्या प्रत्येकाला या विकासाने आनंद होतोच ना. मग कुणी एकत्र आले तरी काय, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. मलाही असेच वाटते महाराष्ट्राच्या विकासाची इच्छा त्या दोघांचीही आहे.