Raj Thackeray Press Conference| मराठी भाषा संपवण्याचा डाव खपवून घेणार नाही : राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray Press Conference| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या हिंदी भाषा धोरणावर जोरदार टीका केली.
Raj Thackeray
Raj Thackeray File Photo
Published on
Updated on

Raj Thackeray Press Conference

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या हिंदी भाषा धोरणावर जोरदार टीका केली. शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्‍यांनी सरकारवर निशाणा साधला.

Raj Thackeray
Water crisis : अंधेरी, वेसावे विभागात दोन दिवस पाणी नाही

आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही

या वेळी राज ठाकरे म्‍हणाले की, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीने शिकवणे हा मराठी भाषेच्या अस्मितेला धक्का आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला तर मनसे तीव्र आंदोलन छेडेल. मराठी भाषा सर्व शाळांमध्ये बंधनकारक असली पाहिजे. शासनाने याबाबत स्पष्ट आणि लेखी आदेश काढावा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

Raj Thackeray
Dada Bhuse News Update| मराठी, इंग्रजी बंधनकारक ! 'हिंदी'बाबत शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?

हिंदीची सक्ती दक्षिणेत दाखवा, महाराष्ट्रात नाही

“सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली आहे. हे आम्ही कदापिही मान्य करणार नाही. मी १७ एप्रिललाच याविरोधात पत्र दिले होते. दुसऱ्या प्रांतातली भाषा इथे का शिकवली जात आहे, हा प्रश्न आम्ही सरकारपुढे मांडतोय. हिंदीच्या नावावर 'राजकीय पोळी भाजण्याचा' हा प्रकार असल्‍याचा आराेप करत हिंदी सक्ती महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे. हिंदीची सक्ती दक्षिणेत दाखवा, महाराष्ट्रात नाही. आम्ही हे शाळांमध्ये होऊ देणार नाही. याला आत्ताच रोखले नाही तर भविष्यात मराठी अस्तित्व संकटात येईल, असा इशाराही त्‍यांनी दिला.

आपल्या भाषेची अस्मिता कधी जपणार?

हिंदी भाषेची सक्‍ती नाही, अशी घोषणा केली होती; मग शाळांमध्ये हिंदी पुस्तके कशी पोहोचली? यासंदर्भातील शासकीय आदेश कुठे आहे? लेखी आदेश का नाही?आपल्या भाषेची अस्मिता कधी जपणार?”, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. तसेच याप्रश्‍नी त्‍यांनी शाळांच्‍या मुख्‍याध्यापकांना पाठवलेल्‍या पत्रात लिहिले आहे की, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. राज्यभाषा मराठी आहे आणि ती आपण मरू द्यायची नाही. सरकारवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही आमच्या सोबत आहात. कोणताही दबाव येऊ दिला नाही पाहिजे. हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे.” “

Raj Thackeray
Mumbai University evaluation flaws : उत्तरपत्रिका तपासणीतही आता परीक्षा विभागाचा घोळ

गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का?

गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? हिंदी भाषा सुंदर आहे, पण ती राष्ट्रीय भाषा नाही. कोणी हवं असल्यास पुढे कॉलेजमध्ये घेईलच, पण पहिलीपासून शिकवण्याची गरज काय? ही सगळी IAS लॉबीसाठी तयारी आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.

मध्य प्रदेश, बिहारमध्ये तुम्ही मराठी शिकवत आहात का?

हिंदी भाषेच्‍या निर्णयाबाबत मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. केंद्राच्या कोणत्याही पत्रात ही सक्तीचा उल्लेख नाही. मग यांचा आधार काय? मध्य प्रदेश, बिहारमध्ये तुम्ही मराठी शिकवत आहात का?”, असा सवाल करत मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन याचा विरोध केला पाहिजे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news