War2 and Coolie Collection: वॉर 2 आणि कुलीमध्ये कोण ठरले सरस? इतके आहे पहिल्यादिवशीचे कलेक्शन

या सिनेमांच्या निमित्ताने रजनीकांत विरुद्ध हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटी आर असा सामनाच बॉक्स ऑफिसवर
Entertainment News
pudhari
Published on
Updated on

काल बहुप्रतीक्षित बिग बॅनर वॉर 2 आणि कुली हे दोन सिनेमे रिलीज झाले. या सिनेमांच्या निमित्ताने रजनीकांत विरुद्ध हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटी आर असा सामनाच बॉक्स ऑफिसवर रंगला. एकीककडे रजनीचे कट्टर फॅन्स तर दुसरीकडे हृतिकचा चार्म यात कोण जिंकणार ते बॉक्स ऑफिसचे कलेक्शनच ठरवेल. जाणून घेऊया. (Latest Entertainment Update)

अशी आहे दोघांची ओपनिंग

Saknilk च्या आकडेवारीनुसार हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटी आर स्टारर वॉर 2 हा 2019 मध्ये आलेल्या वॉरचं सिक्वेल आहे. या सिनेमाने आतापर्यंत सर्व भाषांमध्ये 52050 कोटींची कमाई केली आहे. वॉर 2 च्या ओपनिंगची कमाई हिन्दी व्हर्जनमध्ये 29 कोटी रुपये तर तेलुगूमध्ये 23.25 इतके आहे. तर या सिनेमाच्या तमिळ व्हर्जनने 25 कोटी कमावले आहेत.

कुलीचे आकडे मात्र जोरदार वर चढताना दिसत आहेत. Saknilkच्या आकड्यानुसार कुलीने भारतात 65 कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. तार जगभरात कुलीने 150 कोटीची कमाई केली आहे. कोणत्याही तमिळ सिनेमापेक्षा हे आतापर्यंतचे सर्वात जास्त कलेक्शन आहे.

कोणत्यावेळी किती कलेक्शन?

वॉरची सुरुवात हळू झाली. पण संध्याकाळी आणि रात्रीच्या शोला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा उपयोग कलेक्शन वाढण्यास झाली. सकाळी 16.37%, दुपारी 2.67%, संध्याकाळी 29% तर रात्री 47.90% या क्रमाने प्रेक्षकांची संख्या वाढत गेली.

तर कुलीबाबत बोलायचे झाल्यास त्याची सुरुवातच दमदार झाली. अडवांस बुकिंगचा वाढता फायदा या सिनेमाला झाला. या सिनेमाच्या सकाळच्या शोला जवळपास 81.95% लोकांचा प्रतिसाद मिळाला. तर दुपारी यात आणखी वाढ झाली. दुपारी 85.13%, संध्याकाळी 86.57% तर रात्री मध्ये ती मोठ्याप्रमाणात वाढून 94.32% इतकी मोठी झाली. या सिनेमाचे जगभरातील कलेक्शन जवळपास 150 कोटी रुपये इतके प्रचंड आहे.

कुलीच्या तुलनेत वॉर 2ची पीछेहाट का?

वॉर 2 च्या पहिल्या दिवशीच्या ओपनिंगने छावाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईला मागे टाकले आहे. तरीही हे कलेक्शन कुलीशी तुलना करता खूपच मागे आहे. हृतिक आणि ज्यू एनटी आरची जादूही म्हणावी इतकी चालली नाही हेच यातून दिसून येते आहे. अर्थात या लॉन्ग वीकएंड चं या दोन्ही सिनेमांना फायदा होईल यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news