War-2 Trailer | दोन तगडे कलाकार आमने-सामने; वॉर-२ मध्ये भिडले ऋतिक-ज्यु. एनटीआर

hritik roshan jr ntr War 2 Trailer released | यश राज फ़िल्म्स कडून वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटाचा – वॉर 2 – ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला
image of War 2 poster
War 2 Trailer released Instagram
Published on
Updated on

hritik roshan jr ntr War 2 Trailer released

मुंबई - यश राज फिल्म्स कडून बहुप्रतीक्षित चित्रपट वॉर-२ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सुपरस्टार्स ऋतिक रोशन, एनटीआर ज्युनियर आणि कियारा अडवाणी झळकणार आहेत. दोन दिग्गज कलाकार ऋतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचा गौरव साजरा करण्यात आला आहे. म्हणून या खास औचित्याने २५ जुलै रोजी वॉर -२ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

image of War 2 poster
War 2 Trailer | ज्यु. एनटीआर-ऋतिक रोशनच्या 'वॉर-२’ साठी काऊंटडाऊन सुरु, कधी व किती वाजता पाहता येणार ट्रेलर?

हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. वायआरएफ स्पाय युनिव्हर्सने वॉर २ चे हा महत्त्वाचा चित्रपट आणला आहे. दोन्ही स्टार्सच्या चाहता वर्ग वेगवेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचा कस पाहण्यासाठी हे चाहते सज्ज झाले आहेत. चित्रपटात ते एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हा थरारक ट्रेलर तुम्ही पाहिला का?

image of War 2 poster
Salman Khan | Bigg Boss -19 च्या थीममध्ये मोठा बदल ते सलमानने शोसाठी किती पैसे घेतले? जाणून घ्या सर्व काही

वॉर २ हा १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

ज्यु. एनटीआर विषयी थोडेसे-

ज्यु. एनटीआर दाक्षिणात्य अभिनेता आहे. तेलुगु चित्रपटातील एक सुपरस्टार अभिनेता असून अनेक ॲक्शन चित्रपटांसाठी तो "यंग टायगर" नावाने ओळखला जातो. त्याचे वडील नंदमुरी हरिकृष्ण प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. ज्यु. एनटीआरने टेम्पर, जय लव कुश, आदि, आरआरआर असे एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहेत. एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर या या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील जिंकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news