

War 2 Trailer Release Date and Time revealed
मुंबई- यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा चित्रपट वॉर २ चा ट्रेलरसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर कधी आणि किती वाजता रिलीज होणार याबद्दल सांगितले आहे. चित्रपटाची रिलीज डेट समोर येताच निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज डेटची देखील घोषणा केलीय. सोबत ट्रेलर रिलीज वेळदेखील जाहीर केलीय. वॉर २ हा भारतीय सिनेमातील पहिला चित्रपट असेल, जो डॉल्बी सिनेमासोबत रिलीज होईल.
वॉर 2 (हिंदी आणि तेलुगू) १४ ऑगस्ट रोजी डॉल्बी सिनेमा स्क्रीनवर जगभरातील अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरेल, अशी घोषणा यश राज फिल्म्स आणि डॉल्बीने (डॉल्बी लॅबोरेटरीज) केली आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये नॉर्थ अमेरिका, युनायटेड किंगडम, युएई, सौदी अरेबिया, कुवेत आणि जगभरातील इतर मार्केटमध्येही रिलीज केला जाईल.
War 2 चा ट्रेलर आधी २३ जुलै २०२५ रोजी रिलीज होणार होता. पण, सैयाराच्या यसानंतर चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा ट्रेलर २५ जुलै, २०२५ रोजी रिलीज होईल. सोबतच आज War 2 चे नवे पोस्टर जारी करण्यात आले आहे. वॉर २ चा ट्रेलर उद्या २५ जुलैला सकाळी १०:०८ वाजता रिलीज केला जाईल. ट्रेलर हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होईल.