Mrunal Thakur- Dhanush family
Mrunal Thakur follow on Instagram Dhanush sisters Instagram

Mrunal Thakur | Dhanush च्या बहिणींशीही मृणालचा संपर्क; नात्याबाबत चर्चा पुन्हा उफाळल्या!

Mrunal Thakur- Dhanush | धनुष-मृणाल गॉसिपला नवा ट्विस्ट; बहिणींसोबतच्या मैत्रीमुळे चर्चांना उधाण
Published on

Mrunal Thakur follow on Instagram Dhanush sisters

मुंबई - अजय देवगनचा कॉमेडी चित्रपट सन ऑफ सरदार २ मध्ये मृणाल ठाकुरने राबियाची भूमिका साकारली. आता धनुष आणि मृमाल यांच्या डेटिंगची चर्चा रंगलीय. याबद्दल दोघांकडूनही कोणताही खुलासा वा स्पष्टीकरण आलेले नाही. दरम्यान, आता तिची आणखी एका गोष्टीमुळे चर्चा होतेय, ज्यामुळे असा तर्क लावला जात आहे की, मृणाल आणि धनुष नक्कीच एकमेकांना डेट करत आहेत.

Mrunal Thakur- Dhanush family
Janhvi Kapoor Bheegi Saree Song | 'भीगी साडी' पाहून आठवेल 'टीप-टीप बरसा पानी', जान्हवी-सिद्धार्थचे रोमँटिक गाणे

सोशल मीडियावर मृणालने 'त्यांना' केलं फॉलो

अभिनेत्री मृणाल ठाकुर आणि धनुषचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. व्हायरल व्हिडिओत दोघेजण एकमेकांशी काही तरी बोलताना दिसत होते. याशिवाय, सन ऑफ सरदार २ च्या स्क्रीनिंगवेळीही धनुषने हजेरी लावली होती. त्यामुळे दोन्ही कलाकारांच्या डेटिंगची चर्चा रंगली. आता आणखी एक भर म्हणजे मृणालने धनुषच्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं सुरू केलं आहे, असे वृत्त समोर आले आहे.

Mrunal Thakur- Dhanush family
Honey Singh-Karan Aujla | हनी सिंह-करण औजलाच्या गाण्यात आक्षेपार्ह शब्द; महिला आयोगाने पाठवली नोटीस

मृणालचा 'त्या' परिवाराशी संपर्क?

फॅन्सने नोटिस केलं की, मृणालने धनुषच्या दोन्ही बहिणी डॉ. कार्तिका कृष्णमूर्ती आणि विमला गीता यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं सुरू केलं आहे. तर त्या देखील मृणालला फॉलो करतात.

मृणाल-धनुष डेटिंग बझ
धनुष-मृणाल मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. दोघांनी एकमेकांचा हात धरला होता, दोघे एकमेकांच्या कानात काहीतरी बोलताना दिसले होते. धनुष अजय देवगन-मृणालचा चित्रपट "सन ऑफ सरदार २" च्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होण्यास चेन्नईतून मुंबईत आला होता. शिवाय, मृणालला धनुषचा आगामी चित्रपट तेरे इश्क मेंच्या रॅप अप पार्टीमध्ये पाहण्यात आलं होतं. तेव्हापासून डेटिंग बझ सुरु झालं

धनुषचे 'या' अभिनेत्रींशीही जोडले गेले नाव

याआधी श्रुती हासन, त्रिशा कृष्णन, अमला पॉल या अभिनेत्रींसोबत धनुषचे नाव जोडले गेले आहे. श्रुती हासन - धनुषने एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. '3' या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. त्रिशा कृष्णन - धनुषने ‘कोडी’ चित्रपटात काम केले होते. सोशल मीडियावरून त्यांच्या अफेअरची चर्चा झाली होती. साऊथ अभिनेत्री अमला पॉल-धनुषने 'रघुवरन बीटेक' चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी ठरली. नंतर असेदेखील वृत्त आले की, दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news