Viral Teacher Dance | स्नेहसंमेलनात शिक्षिकेची पावले थिरकली ‘मुकाबला’ गाण्यावरः प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्टया, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक!

मुलांच्याबरोबर डान्स करताना दाखलेले कौशल्याने अनेकांची मने जिंकली
Viral Teacher Dance | स्नेहसंमेलनात शिक्षिकेची पावले थिरकली ‘मुकाबला’ गाण्यावरः प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्टया, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक!
Published on
Updated on

Viral Teacher Dance शालेय जीवनातील 'स्नेहसंमेलन' (Gathering) हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण सध्या इन्स्टावर एका शाळेतील एका कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टेजवर विद्याथर्यांसोबत त्‍याच्या शिक्षीकाही डान्स् करताना दिसतात. प्रभू देवाचा व ए. आर. रेहमान यांच्या प्रसिद्ध गाणे मुकाबला - मुकाबला या गाण्यावर संबधित शिक्षिका व स्टूडंट डान्स करताना दिसत आहेत. winning everyone heart अशी कॅप्शन ठेवून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

डान्स् कौशल्याने सर्वांचे लक्ष घेतले वेधून

या शिक्षिकेने आपल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विषेष म्हणजे एका साडी परिधान केलेल्या शिक्षिकेने केलेल्या भन्नाट डान्सने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सुरू आहे. स्टेजवर 'मुकाबला' गाणे वाजताच एक शिक्षिका पूर्ण उत्साहात डान्स करायला सुरुवात करते.

साडी घालूनही डान्स् स्टेप परफेक्ट

साडी नेसलेली असूनही त्यांच्या डान्स स्टेप्समध्ये कुठेही अडथळा जाणवत नाही. उलट, प्रभू देवाच्या त्या कठीण स्टेप्स त्यांनी अत्यंत सहजतेने आणि लवचिकपणे केल्या आहेत. शिक्षिका डान्स करत असताना समोर बसलेले विद्यार्थी शिट्ट्या वाजवून आणि ओरडून त्यांना दाद देत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

‘साडीमध्ये इतका ग्रेसफुल डान्स करणे खरोखर कौतुकास्पद आहे.’ ‘शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमधील हे नाते बघून खूप आनंद झाला’ अशा प्रतिक्रीया समाजमाध्यमांमध्ये उमटत आहेत. काहींनी या शिक्षिकेचा डान्स पाहून अनेकांनी त्यांना 'सर्वात कूल टीचर' अशी पदवी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news