Vikram : सलमान खानची साऊथच्या पार्टीत एंट्री; ‘विक्रम’च्या यशात सहभागी

Vikram : सलमान खानची साऊथच्या पार्टीत एंट्री; ‘विक्रम’च्या यशात सहभागी

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्रम चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर दमदार यश मिळवल्याबद्दल साऊथच्या सुपरस्टारने एका पार्टीचे आयोजन केले. या पार्टीमध्ये सलमान खानला देखील निमंत्रित करण्यात आले होते. या पार्टीचे फोटो अभिनेता चिरंजीवीने सोशल मिडियावर पोस्ट करत सलमानला आणि इतर सर्व सुपरस्टार्सचे अभिनंदन केले आहे. (Vikram)

कमल हसन यांचा नुकताच रिलीज झालेला विक्रम या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चिरंजीवीने त्यांच्या घरी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. कमल हसन, निर्माता लोकेश कनगराज आणि सलमान खान या पार्टीत सहभागी झाले होते. दरम्यान, चिरंजीवीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पार्टीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये चिरंजीवी, कमल हासन आणि लोकेश कनगराज यांच्यासह बॉलिवूड अभिनेता सलमान खान देखील उपस्थित होता.

या पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चिरंजीवीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे की, "काल रात्री माझ्या घरी झालेल्‍या पार्टीमधून विक्रमने मिळवलेल्या शानदार यशाबद्दल, माझे सर्वात प्रिय मित्र कमल हासन आणि माझा लाडका भाऊ सल्लू, लोकेश कनगराज आणि टीमचा सन्मान आणि आनंद साजरा केला."

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विक्रम हा लोकेश कनगराज दिग्दर्शित ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात कमल हसनसोबत विजय सेतुपती आणि फहद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 3 जून रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 200 कोटींचा आकडा पार केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news