Haunted 3D Echoes Of The Past - भुताटकी महलचा थरार परत येतोय! Vikram Bhatt चा 'हॉन्टेड 3D' टीजर रिलीज

Vikram Bhatt Haunted 3D - भुताटकी महलचा थरार अनुभवयला व्हा सज्ज! विक्रम भट्टने आणला 'हॉन्टेड 3D'; टीजर पाहाच
Haunted 3D Echoes Of The Past
Haunted 3D Echoes Of The PastInstagram
Published on
Updated on

हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचा चित्रपट 'हॉन्टेड 3D'चा टीजर जारी झाला आहे. पुन्हा एकदा भूताटकी असलेल्या महलची कहाणी पाहायला मिळणार आहे. २०११ मध्ये हॉरर 'हॉन्टेड 3D' नंतर दुसरा भाग 'हॉन्टेड 3D: घोस्ट ऑफ द पास्ट' येत असून टीजर जारी करण्यात आला आहे.

चित्रपटामध्ये पुन्हा एकदा मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती मुख्य भूमिकेत दिसेल. सोबत चेतना पांडे, प्रणीत भट्ट, हेमंत पांडे, श्रुती प्रकाश, गौरव वाजपेयी स्टार्स दिसणार आहेत. आनंद पंडित आणि राकेश जुनेजा द्वारा निर्मित चित्रपटाची निर्मिती प्रोमोएज मीडिया प्रायवेट लिमिटेड द्वारा करण्यात आले आहे.

Haunted 3D Echoes Of The Past
Raja Shivaji Vidya Balan |'यालाच म्हणतात नशीब!' 'बडी बेगम'ची भूमिका तब्बूने नाकारली अन् हजारो रिजेक्शन झेलणाऱ्या 'या' अभिनेत्रीचं नशीब फळफळलं!

हा चित्रपट आधीपासूनच त्याच्या वेगळ्या हॉरर अनुभवासाठी ओळखला जातो. चित्रपटात 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून आता पुन्हा एकदा भुताटकी महलचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

रिलीज झालेल्या टीजरमध्ये अंधार, शांतता आणि अचानक समोर येणाऱ्या भयावह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. काही सेकंदांचा हा टीजर अंगावर काटा आणणारा आहे. विशेष म्हणजे, पार्श्वसंगीत आणि साऊंड इफेक्ट्समुळे हा थरार आणखी वाढतो.

विक्रम भट्ट यांना हॉरर चित्रपटांसाठी खास ओळखले जाते. त्यांनी याआधीही अनेक यशस्वी हॉरर चित्रपट दिले आहेत. टीजरची सुरुवात कारमध्ये बसलेल्या मिमोहपासून होते. काही तरी मिळवण्यासाठी तो एका महलकडे जातो. तो महलमध्ये पोहोचताच अजीब घटना सुरू होते. तेव्हा चेतना यांची एंट्री होते. चेतना मुख्य अभिनेत्री आहे.

Haunted 3D Echoes Of The Past
Sairat fame Arbaj Shaikh Wedding | 'सैराट'च्या सल्याने उरकला निकाह! सिमरनच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फेल; पाहा फोटो

टीजरमध्ये रहस्यांचा उलगडा झालेला दिसत नाही पण दृश्ये पाहताना खूपच भीतीदायक आणि अंगावर काटे आणणारे आहेत. हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहात हिंदी, तमिळ, तेलुगु भाषेत रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news