Raja Shivaji Vidya Balan |'यालाच म्हणतात नशीब!' 'बडी बेगम'ची भूमिका तब्बूने नाकारली अन् हजारो रिजेक्शन झेलणाऱ्या 'या' अभिनेत्रीचं नशीब फळफळलं!

Raja Shivaji Vidya Balan | यालाच म्हणतात नशीब! बडी बेगमची भूमिका मिळणार होती तबूला..पण हजारो रिजेक्शन झेलणाऱ्या 'या' अभिनेत्रीलाच मिळाला 'राजा शिवाजी' चित्रपट
Raja Shivaji Vidya Balan
Raja Shivaji Vidya Balan pudhari photo
Published on
Updated on
Summary

Vidya Balan हिला ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील महत्त्वाची भूमिका मिळाल्याची चर्चा आहे. ‘बडी बेगम’साठी सुरुवातीला Tabu हिचं नाव पुढे होतं, मात्र अखेरीस अनेक रिजेक्शनचा सामना केलेल्या विद्याला ही संधी मिळाल्याने तिच्या नशिबाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विद्या बालन हिला ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील महत्त्वाची भूमिका मिळाल्यानंतर आता तिची चर्चा होताना दिसतेय. ‘बडी बेगम’साठी सुरुवातीला तबू हिचं नाव पुढे होतं. मात्र ऐनवेळेला विद्याला ही संधी मिळाली. म्हणतात ना - नशीब कधी पालटेल, सांगता येत नाही.

बॉलिवूडमध्ये कास्टिंगचे निर्णय कधी कधी आश्चर्यचकित करणारे ठरतात. सध्या ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित चित्रपटामुळे अशीच एक चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील ‘बडी बेगम’ या महत्त्वाच्या भूमिकेसाठी सुरुवातीला तबूला विचारण्यात आलं होतं. मात्र अखेरीस ही भूमिका विद्या बालनच्या झोळीत पडली.

Raja Shivaji Vidya Balan
How Genelia Deshmukh learned Marathi | लग्नानंतर सासरच्या घरासाठी शिकली मराठी; जेनेलिया इतकं शुद्ध कसं बोलते? ‘हे’ आहे तिचे सीक्रेट!

विद्या बालन ही बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक प्रोजेक्ट्समधून तिला रिजेक्ट केलं गेलं होतं. इतकंच नव्हे, तर काही चित्रपटांतून तिला अचानक बाहेरही काढण्यात आलं होतं.

ती बॉलिवूडमधील प्रस्थापित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयाने तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात विद्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या दिसण्यावर अधिक चर्चा होत होती. बॉडीशेमिंगपासून ते तिच्या लुक्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. एका मुलाखतीत विद्याने धक्कादायक खुलासे केले होते. आहे. तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटाच्या वेळी, म्हणजेच Parineetaच्या शूटिंगदरम्यान, दिग्दर्शक Vidhu Vinod Chopra यांनी तिला नाकाची सर्जरी (nose surgery) करण्याचा सल्ला दिला होता.

Raja Shivaji Vidya Balan
Sairat fame Arbaj Shaikh Wedding | 'सैराट'च्या सल्याने उरकला निकाह! सिमरनच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फेल; पाहा फोटो

हा सल्ला तिच्यासाठी मोठा धक्का होता. कारण त्या काळात ती इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत होती. अशा वेळी तिच्या दिसण्यावरच प्रश्न उपस्थित झाल्याने परिस्थिती आणखी कठीण झाली. विद्या म्हणाली की, परिणीता हा माझा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता आणि याच चित्रपटाच्या वेळी मला एक अनपेक्षित सल्ला मिळाला. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं, ‘तुझे नाक खूप लांब आहे, सर्जरी करून घेऊया.’”

तिने ठाम भूमिका घेत हा सल्ला नाकारला. “मी माझ्या चेहऱ्यावर कधीही कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. साध्या फेशियलशिवाय मी काही करत नाही,” असं ती ठामपणे म्हणाली. विद्याने पुढे सांगितलं की, “देवाने जसा चेहरा दिला आहे, तसाच तो स्वीकारावा, यावर माझा नेहमीच विश्वास आहे.” तिच्या या विचारांमुळेच तिने इंडस्ट्रीतील ठराविक सौंदर्याच्या निकषांना कधीही मान्यता दिली नाही. इतकंच नाही, तर एका मल्याळम चित्रपटाच्या वेळी तिला तिचं नाव बदलण्यासही सांगण्यात आलं होतं. 'मंजू वारियर' किंवा 'संयुक्ता वर्मा' यांच्यासारखं 'बालन' आडनाव काढून 'अय्यर' लावायला सांगितलं होतं. पण शेवटी भाग्यचं. सौंदर्याचे प्रमाण न जुमानता विद्याने आहे त्या चेहऱ्यासोबत आपला अभिनय चालू ठेवला. नियत, शेरनी, शकुंतला, मुन्नाभाई एमबीबीएस, द डर्टी पिक्चर, इश्किया असे असंख्य चित्रपट आपल्या नावे केले.

संघर्षाची अशी पार्श्वभूमी असताना ‘राजा शिवाजी’सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये तिला संधी मिळणं हे तिच्यासाठी मोठं यश मानलं जात आहे. ‘बडी बेगम’ ही भूमिका कथानकात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीची निवड करणं निर्मात्यांसाठी मोठं आव्हान होतं.

photos- vidyabalan_uk insta वरून साभार

सुरुवातीला या भूमिकेसाठी तबूचं नाव चर्चेत होतं. तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती या भूमिकेसाठी परफेक्ट निवड ठरली असती, असंही अनेकांचं मत होतं. मात्र कास्टिंगमध्ये झालेल्या बदलांमुळे ही संधी विद्याला मिळाली. सोशल मीडियावरही या बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण विद्याच्या निवडीचं स्वागत करत आहेत, तर काहींना तबूला ही भूमिका न मिळाल्याचं आश्चर्य वाटत आहे. पण तबूच्या अन्य प्रोजेक्ट्सचे आणि राजा शिवाजी चित्रपटाची तारखा न जुळल्यामुळे तबूला बाहेर पडावे लागले आणि ही भूमिका विद्याच्या पदरी पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news