Vikas Samudre: ‘I am committing...’; विकास समुद्रे यांच्या पोस्टमुळे खळबळ, पोलिसांनी तातडीने साधला संपर्क, पुढे काय घडलं?

Vikas Samudre Facebook Post: विकास समुद्रे यांच्या फेसबुक अकाउंटवर ‘I am committing Suicide...’ अशी पोस्ट दिसल्यानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली.
Vikas Samudre Facebook Post
Vikas Samudre Facebook PostPudhari
Published on
Updated on

Vikas Samudre Facebook Post: मराठी अभिनेते विकास समुद्रे यांच्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली. ‘I am committing Suicide...’ असा मजकूर असलेली पोस्ट सोशल मीडियावर दिसल्यानंतर चाहते चिंतेत पडले. काही वेळातच ही बाब मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणताही विलंब न करता अभिनेत्याशी संपर्क साधला.

या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. सायबर विभागाचे डीसीपी बजरंग बनसोडे यांनी स्वतः विकास समुद्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर अभिनेता सुरक्षित असल्याचे समजले.

नेमकं काय घडलं?

विकास समुद्रे यांच्या फेसबुक अकाउंटवर जीवन संपवणार असल्याची पोस्ट करण्यात आली होती. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत अभिनेत्याला धीर देण्याचा आणि कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला.

मात्र, पोलिसांशी संपर्क झाल्यानंतर या पोस्टमागील वेगळेच कारण समोर आले. फेसबुकवर पोस्ट करताना टायपिंगची चूक झाल्याचे विकास समुद्रे यांनी स्पष्ट केले. जीवन संपवण्याचा त्यांचा कोणताही विचार नव्हता, तसेच ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चाहत्यांच्या काळजीने भरलं कमेंट सेक्शन

पोस्ट सोशल मीडियावर दिसताच चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली, तर काहींनी त्यांना घाईत कोणतीही कृती न करण्याचे आवाहन केले.

‘काही अडचण असेल तर त्यावर मार्ग नक्कीच निघू शकतो’, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या. त्यामुळे काही काळासाठी विकास समुद्रे यांच्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.

Vikas Samudre Facebook Post
Haiwaan Movie Review: अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा 'हैवान' प्रदर्शित; जाणून घ्या कसा आहे चित्रपट

आयुष्यातील कठीण काळ

काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये विकास समुद्रे यांनी त्यांच्या आयुष्यातील एका कठीण टप्प्याबद्दल भाष्य केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा सामना करावा लागला होता. त्या काळातील अनुभव आणि त्यातून आलेल्या कटू आठवणी त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या होत्या.

हा काळ आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे फेसबुकवरील पोस्टनंतर चाहत्यांची चिंता आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले.

Vikas Samudre Facebook Post
Jahnavi Killekar: ‘माझ्या हातात माईक असताना...’; नांदेडच्या दहीहंडीत नेमकं काय घडलं? जान्हवी किल्लेकरने केला मोठा खुलासा

‘नवरा माझा नवसाचा’मुळे मिळाली विशेष ओळख

विकास समुद्रे यांनी मराठी रंगभूमीवर तसेच चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे त्यांनी मराठी मनोरंजनविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, फेसबुकवरील पोस्टमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून विकास समुद्रे सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news