

Vijay Varma - Fatima Sana Shaikh Gustaakh Ishq Release date final
मुंबई - बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या आणि हटके भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता विजय वर्मा आणि ‘दंगल’ फेम फातिमा सना शेख ही जोडी पहिल्यांदाच एका रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे. या दोघांचा आगामी सिनेमा ‘गुस्ताख इश्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांच्या फॅन्ससाठी ‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट एक रोमँटिक मेजवानी ठरणार आहे.
हा चित्रपट मनीष मल्होत्राचा एक पॅप्रोजेक्ट आहे, जो प्रेम, भावनिक नातेसंबंध, संवेदनशील कथा दाखवतो. या चित्रपटात विजय वर्मा, फातिमा सना शेख आणि नसीरुद्दीन शाह या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटाचे पहिले गाणे "उलजलूल इश्क" नुकतेच रिलीज झाले असून ते संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरले आहे.
दिग्दर्शन विभू पुरी यांचे असून या गाण्यात विशाल भारद्वाजचे संगीत, गुलजार यांचे गीत, ऑस्कर विजेते रसूल पुकुट्टी यांचे साऊंड डिझाइन आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पा राव आणि पापोन यांचे मधुर आवाज आहेत.
चित्रपटात जुन्या दिल्लीतील अरूंद गल्ल्या, पंजाबच्या हवेल्यांमदील एक कधीही समोर न आलेली प्रेमाची संवेदनशील कहाणी आहे. दिनेश मल्होत्रा यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती मनीष मल्होत्रा करत आहेत.
विजय वर्मा आणि फातिमा सना शेख ऑनस्क्रिन रोमान्सचा तडका लावताना दिसणार आहेत. मागील काही दिवसांपासून दोघांचे एकत्र फोटो समोर आले आहेत. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचेही वृत्त आहे. पण दोन्ही स्टार्सकडून याबद्दल खुलासे झालेले नाहीत.