‘या अली’ फेम गायक Zubeen Garg यांचा स्कूबा डायव्हिंगवेळी सिंगापूरमध्ये अपघाती मृत्यू

‘या अली’ गाण्याने संपूर्ण देशाला भुरळ घालणारे गायक जुबीन गर्ग यांचे निधन
Zubeen Garg
Zubeen Garg diies during scuba diving Instagram
Published on
Updated on

zubeen garg dies scuba diving accident Singapore

मुंबई - संगीतविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघाती निधन झाले. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली.

Zubeen Garg
Youtuber Akshay Vashisht | ''गोव्याच्या रनवेवर लाल साडीतील बाई..''प्रसिद्ध युट्यूबरने टाकला असा व्हिडिओ की..झाली अटक

जुबीन गर्ग यांनी बॉलिवूडमध्ये गाजलेलं ‘गँगस्टर’ या इमरान हाशमी आणि कंगना रनौत स्टारर चित्रपटातील ‘या अली’ हे गाणं गाऊन लोकप्रियता मिळवली होती. या गाण्याने त्यांना केवळ हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं नाही, तर त्यांचं नाव देशोदेशी गाजलं. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी, आसामी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली होती.

Zubeen Garg
Robo Shankar Death | प्रसिद्ध तमिळ अभिनेते रोबो शंकर यांचे निधन, कमल हासन यांनी व्यक्त केलं दु:ख

आसामी गायक २० आणि २१ सप्टेंबर रोजी नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरमध्ये होते, जिथे त्यांचे सादरीकरण होणार होते.

नेमके काय घडले?

त्यांना समुद्रातून वाचवण्यात आले आणि सीपीआर देण्यात आला, परंतु सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला, जिथे त्यांना नेण्यात आले. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सिंगापूरमधील नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या प्रतिनिधीने एका वेबसाईटला सांगितले की, स्कूबा डायव्हिंग करताना गर्ग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

काय म्हणाले नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे प्रतिनिधी?

"आम्हाला झुबीन गर्गच्या निधनाची बातमी सांगताना खूप दुःख होत आहे. स्कूबा डायव्हिंग करताना त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांना ताबडतोब सीपीआर देण्यात आला. दुपारी २.३० च्या सुमारास आयसीयुमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले."

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी झुबीन गर्ग यांच्याबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी एक्स अकाऊंटवर श्रद्धांजली वाहिती आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय-ते "खूप लवकर गेले आहेत, हे जाण्याचे वय नाही".

'आसामने प्रिय मुलगा गमावला'

आसामचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अशोक सिंघल यांनी एक्स अकाऊंटवर जुबीन यांना श्रद्धांजली वाहिली.

ते ट्विटमध्ये म्हणाले, "आमच्या प्रिय झुबीन गर्गच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले आहे. आसामने केवळ एक आवाजच नाही तर एक हृदयाचा ठोका गमावला आहे."

प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग
ज़ुबीन गर्ग यांनी आसामी, बंगाली, हिंदी भाषेतील गाणी गायली आहेत. इमरान हाशमी - कंगना रनौत यांच्या गँगस्टर चित्रपटातील "या अली" गाण्यातून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. क्रिश-३ मध्ये "दिल तू ही बता" हिट गाणे देखील त्यांनी गायले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news