

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हँडसम अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याच्या हातात दिसलेली साखरपुड्याची अंगठी! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका नव्या फोटोमध्ये विजयच्या हातात एक आकर्षक अंगठी स्पष्टपणे दिसत आहे. आणि तो फोटो पाहताच नेटकरी म्हणाले — “Confirm!”
विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचं नातं गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबद्दल कधीच स्पष्ट बोललं नाही, पण त्यांच्या हावभावांमुळे, सुट्ट्यांतील फोटोंमुळे आणि मुलाखतींतील इशाऱ्यांमुळे चाहत्यांना नेहमीच शंका यायची की काहीतरी चालू आहे. आता रश्मिका मंदाना २९ वर्षांची आहे तर विजय देवरकोंडा ३६ वर्षांचा आहे.रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे स्टार कपल लग्नाच्या बंधनात अडकतील, असे म्हटले जात आहे.
विजय देवरकोंडा श्री सत्य साईं बाबा यांच्या महासमाधी स्थळी दर्शन करण्यास पोहोचले. तिथे लोकांनी त्याचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या हातात पुष्पगुच्छ आणि हातात रिंग फिंगरमध्ये अंगठी दिसली.
दरम्यान, रश्मिका - विजय ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. दसऱ्याला दोघांनी साखरपुडा देखील केल्याचे वृत्त समोर आले. आता विजयच्या हातातील अंगठीच्या फोटोनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. अनेक चाहत्यांनी कॉमेंटमध्ये लिहिलं – “Finally confirmed!”, “Congratulations Vijay and Rashmika”, तर काहींनी म्हटलं – “रश्मिकाचा साखरपुडा झाला म्हणायचं आता!”
विजयने मात्र यावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचा फोटो एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये घेतला गेला होता, आणि त्या वेळी त्याने हातात एक रिंग घातली होती. काही चाहत्यांच्या मते ती फॅशन रिंग असू शकते, पण बहुतेक चाहत्यांना ती एंगेजमेंट रिंग असल्याचे म्हटले आहे.