

Zubeen Garg Last Film release date announces
मुंबई - आसामचे गायक, संगीतकार, जुबीन गर्ग यांच्या शेवटच्या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘रोई रोई बिनाले’ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर झाली असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा भावनिक वातावरण निर्माण झालं आहे. जुबीन गर्ग यांनी आयुष्याच्या अखेरच्या काळात हा चित्रपट पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जुबीन गर्ग हे केवळ गायक नव्हे तर एक बहुगुणी कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी हिंदी आणि आसामी दोन्ही भाषांमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यांच्या आवाजाने ‘या अली’ (चित्रपट – गँगस्टर) हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात कोरलं गेलं आहे.
चित्रपट निर्माते राजेश भुयान म्हणाले की, जुबीन गर्ग आपला चित्रपट 'रोई रोई बिनाले'वर जवळपास ३ वर्षांपासून काम करत होते. जुबीन यांची इच्छा होती की, हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी रिलीज केला जावा. यामध्ये त्यांचा ओरिजिनल आवाज देखील आहे. देशभरात थिएटर्समध्ये चित्रपट रिलीज केला जाईल.
आसामी चित्रपट निर्माते राजेश भुयान यांनी पुष्टी केली की, गायक जुबीन गर्ग यांचा अखेरचा चित्रपट 'रोई रोई बिनाले' ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात रिलीज होईल.
राजेश भुलाय यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, 'आम्ही मागील ३ वर्षांपासून चित्रपटात काम करत होतो. कहाणी आणि म्युझिक जुबीन यांनी लिहिली होती. हा पहिला म्युझिकल आसामी चित्रपट होता. आम्ही जवळपास काम पूर्ण केले होते. बॅकग्राउंड म्युजिक शिवाय.'