Vidya Balan: 'इतकीच अडचण असेल तर AIनेच मुलं जन्माला घाला...', विद्या बालन कोणावर संतापली? दिला थेट इशारा

Vidya Balan Slams Trolls Over Body Shaming Women: अभिनेत्री विद्या बालनने महिलांच्या वजनावरून आणि शरीरयष्टीवरून सोशल मीडियावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत.
Vidya Balan
Vidya Balan Pudhari
Published on: 
Updated on: 

Vidya Balan Slams Trolls Over Body Shaming Women: सोशल मीडियावर कलाकारांच्या दिसण्यावरून, त्यांच्या वजनावरून आणि शरीरयष्टीवरून टीका करण्याचे प्रकार वाढत आहेत. एखाद्या अभिनेत्रीचे वजन वाढले की तिची खिल्ली उडवली जाते. विशेषतः आई झाल्यानंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांवरून त्यांना ट्रोल केले जाते. अलीकडेच अभिनेत्री कतरिना कैफ हिला प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनावरून ट्रोल करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या रॅम्प वॉकवरूनही सोशल मीडियावर टीका झाली. आता अभिनेत्री विद्या बालन हिने अशा ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे.

विद्या बालनने नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत ऑनलाइन ट्रोलिंगच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसऱ्यांच्या शरीरावरून टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे, असे स्पष्ट मत तिने मांडले. महिलांच्या शरीरात होणारे बदल समजून न घेता त्यांची खिल्ली उडवणे चुकीचे असल्याचेही तिने ठणकावून सांगितले.

'दुसऱ्यांमध्ये चुका शोधणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे'

सोशल मीडियावर महिलांच्या वजनावरून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना विद्या बालन म्हणाली की, दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या लोकांनी आधी स्वतःकडे आरशात पाहावे. तिच्या मते, दुसऱ्यांमध्ये सतत चुका शोधणारे लोक अनेकदा स्वतःबद्दलच समाधानी नसतात. त्यामुळे ते इतरांच्या दिसण्यावरून टीका करतात.

एखाद्या महिलेचे वजन वाढले किंवा तिच्या शरीरात बदल झाले, म्हणून तिची थट्टा करण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखाद्याच्या शरीरावरून त्याला कमी लेखणे किंवा त्याची खिल्ली उडवणे योग्य नाही, असे विद्या बालनने स्पष्ट केले.

Vidya Balan
Chinmayee Sumit: महाराष्ट्रात पाण्याची टंचाई, अभिनेत्री चिन्मय सुमित यांची भावनिक पोस्ट; म्हणाल्या, ‘मायबाई… काय करता…’

'महिलांना इतकीच अडचण असेल तर AIने मुलांना जन्म द्या!'

विद्या बालनने ट्रोलर्सना उत्तर देताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI चा उल्लेख करत उपरोधिक टोला लगावला. महिलांनी मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचे वजन वाढते, या गोष्टीचा काही लोकांना इतका त्रास होत असेल, तर त्यांनी AI च्या मदतीनेच मुलांना जन्म देण्याचा विचार करावा, असे ती म्हणाली.

तिच्या या विधानातून महिलांच्या शरीरावरून टीका करणाऱ्या लोकांबद्दलचा संताप स्पष्टपणे दिसून आला. प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे त्यांच्या वजनात आणि शरीरयष्टीत बदल होऊ शकतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा वेळी महिलांना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर टीका करणे चुकीचे असल्याचे विद्याने सांगितले.

Vidya Balan
Drishyam 3 BO: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’चा ऐतिहासिक विक्रम; 12 दिवसांत 500 कोटींचा टप्पा पार, कोणत्या चित्रपटांना टाकलं मागे?

'महिलांच्या शरीरावरून खिल्ली उडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?'

विद्या बालनने पुढे सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरून तिची खिल्ली उडवण्याचा किंवा तिला ट्रोल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, त्याचा वापर दुसऱ्यांना दुखावण्यासाठी करणे योग्य नाही.

विशेषतः प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात होणारे बदल समजून घेण्याची गरज आहे. आई झाल्यानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल होतात. अशा काळात त्यांच्या दिसण्यावरून टीका करण्याऐवजी त्यांना समजून घेणे आणि त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news