

मुंबई - विक्की कौशल 'चिंरजीवी परशुराम'च्या रूपात दिसणार आहे. यासाठी त्याने मद्यपान आणि मांसाहार वर्ज्य केलं आहे. अमर कौशिक यांच्या महावतारमध्ये भगवान परशुराम यांची भूमिका विकी साकारणार असून त्याने यासाठी मद्य आणि मांसाहार टाळला आहे. हा चित्रपट २०२८ पर्यंत रिलीज होईल, असे म्हटले जात आहे.
बॉलिवूडचा दमदार अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘महावतार’साठी जोरदार तयारी करत आहे. या चित्रपटातील अध्यात्मिक भूमिकेसाठी विकीने स्वतःच्या आयुष्यात काही कठोर निर्णय घेतले आहेत. नव्या संकल्पानुसार त्याने दारु आणि मांसाहार सोडल्याचे म्हटले जात आहे.
इतकचं नाही, तर तो सध्या योग, ध्यान आणि साधना या दिनचर्येचा भाग बनवून घेत आहे. या चित्रपटात विकीला एक दिव्य आणि आत्मिक शक्तीचा अनुभव असलेली भूमिका प्रेझेंट करायची आहे, यासाठी त्याने स्वतःला तयार केल्याचं म्हटलं जात आहे.
रामायण चित्रपटासाठी रणबीर कपूरने देखील नितेश तिवारीचा चित्रपट रामायणमध्ये प्रभू राम यांची भूमिका साकारत आहे. मागील वर्षीही काही वृत्तांनुसार, असे सांगण्यात आले होते की, रणबीर कपूरने भगवान श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी मांस, अंडी, दारू वर्ज्य केले होते.
रिपोर्ट्सनुसार असा दावा करण्यात आला आहे की, विक्की कौशिल आणि अमर कौशिकने ‘महावतार’ साठी हा नवा संकल्प केला आहे. पुढील वर्षी पूजा मुहूर्तनंतर चित्रपटावर काम सुरू केले जाईल.
दिग्दर्शकाने देखील सोडलं नॉनव्हेज?
सूत्रांनुसार, अमर कौशिक यांनी ‘महावतार’साठी खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये अनेक बदल केले आहेत. विकी कौशलने यापूर्वी सॅम बहादुर, सरदार उधम आणि उरी: द सर्जिकल स्ट्राईक सारख्या चित्रपटांत दमदार भूमिका केल्या आहेत.