

टोरंटोतील कार्यक्रमात तीन तास उशिरा पोहोचल्यामुळे माधुरी दीक्षितवर टीका होत आहे. प्रेक्षकांनी आयोजकांकडे तिकीटांचे पैसे परत देण्याची मागणी केलीय.
मुंबई : २ नोव्हेंबर रोजी कॅनडातील टोरंटो येथील 'द गोल्डन दिवा ऑफ बॉलीवूड टूर' कार्यक्रमात ३ तास उशिरा पोहोचल्याबद्दल प्रेक्षकांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितवर टीका करायला सुरुवात केली. काहींनी तर कार्यक्रमाच पैसे परत देण्याची मागणी केली.
माधुरीला टीका सहन करावी लागली ती तिच्या उशीरा येण्याने. टोरंटो कार्यक्रमात तिने फक्त एक तास सादरीकरण केल्याचाही आरोप करून अनेकांनी पैसे परत देण्याची मागणी केली. एका युजरने याला "वेळेचा पूर्णपणे अपव्यय" म्हटले, तर दुसऱ्या युजरने म्हटले, "आतापर्यंतचा सर्वात वाईट शो, बेढब बोलण्याने भरलेला."
माधुरी दीक्षितचे कॅनडामध्ये फॅन मीट आणि ग्रीट टूर होते. टोरंटोमध्ये तिचा शो होता पण माधुरी शोमध्ये तीन तास उशीरा पोहोचली. ज्यामुळे प्रेक्षक संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले. माधुरीच्या व्हायरल व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं- मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकते, तर ते हे आहे की, माधुरी दीक्षितच्या टूरमध्ये सहभागी होऊ नये, आपले पैसे वाचवा.
एका प्रेक्षकाने लिहिलं - हा आतापर्यंतचा सर्वांत खराब शो होता. विस्कळीत..जाहिरातीत हे सांगण्यात आलं नव्हतं की, त्या केवळ प्रत्येक गाण्यावर दोन सेकंदपर्यंत बोलतील आणि थोडे डान्स करेल. हे खूपच वाईट आयोजन होतं. एकाने ट्विटमध्ये लिहिलं, '३ तास वाट पाहिलं, पण आयोजकांकडून कोणतीही माहिती दिली नाही. ही प्रेक्षकांचा अपमान आहे.' तर दुसऱ्याने म्हटलं, 'आम्ही हजारो रुपये दिले, पण कार्यक्रमाचा अर्धा भाग उशिरामुळे रद्द झाला. रिफंड मिळायला हवा.' आणखी एकाने म्हटलं, 'मी रात्री ११ वाजता गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे ऑफिस होते.'
काही प्रशंसक, चाहत्यांनी मात्र माधुरीची बाजू घेत म्हटलं की उशीर तांत्रिक अडचणींमुळे झाला असावा. एका फॅनने म्हटलं - ती नेहमी प्रमाणे शानदार प्रदर्शन करत आहे. हे प्रोडक्शन वा आयोजकांच्या समन्वयाची समस्या असू शकते. माधुरीने स्वतः या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.