मल्याळम अभिनेते मोहनलाल यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

Mohanlal Health | मोहनलाल यांना श्वास घेण्यास त्रास
Veteran actor Mohanlal
ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Image source- Instagram/mohanlal)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल (Veteran actor Mohanlal) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहनलाल यांना तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास होणे आणि स्नायुदुखी अशी लक्षणे दिसून आली आहेत. यामुळे त्यांना कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकृत वैद्यकीय निवेदनानुसार, मोहनलाल यांना श्वसनाचा संसर्ग झाल्याचा शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

६४ वर्षीय मोहनलाल यांना पाच दिवस सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे आणि औषधोपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोहनलाल यांच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलचे अधिकृत निवेदन मनोरंजन उद्योगातील ट्रॅकर आणि स्तंभलेखक श्रीधर पिल्लई यांनी X ‍‍वर शेअर केले आहे.

'L2: Empuraan' चे शुटिंग पूर्ण केल्यानंतर आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट 'बरोज'चे पोस्ट-प्रॉडक्शन पूर्ण केल्यानंतर मोहनलाल गुजरातमधून कोचीला (Kochi) परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. सुदैवाने, वैद्यकीय अहवालांवरून असे दिसून आले आहे की त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

‘बरोज’ (Barroz) चित्रपट यावर्षी २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सुरुवातीला २८ मार्च २०२४ रोजी रिलीज होणार होता. पण, चित्रपटाच्या टीमने पोस्ट-प्रॉडक्शनला विलंब होत असल्याचे कारण देत रिलीज तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

मोहनलाल यांची चित्रपटसृष्टीत चार दशकांची कारकीर्द

मोहनलाल विश्वनाथन (Malayalam actor Mohanlal) हे दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अभिनेते, चित्रपट निर्माता, पार्श्वगायक, चित्रपट वितरक आणि दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी मुख्यत्वे मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. त्यासोबतच तमिळ, हिंदी तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीतील सुमारे चार दशकांच्या कारकीर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना भारत सरकारने २००१ मध्ये पद्मश्री आणि २०१९ मध्ये पद्मभूषणने सन्मानित केले आहे. मोहनलाल हे २००९ मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून मानद रँक मिळविणारे भारतातील पहिले अभिनेते आहेत.

Veteran actor Mohanlal
Rhea Chakraborty : सुशांत राजपूतनंतर रिया चक्रवर्ती प्रेमात?; बॉयफ्रेंडची एकूण संपत्ती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news