

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे आयुष्य पुर्वपदावर येत आहे. रिया कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरी ती अनेक दमदार शोमध्ये अभिनयाचा ठसा उमठवत आहे. यातून तिची प्रसिद्धसोबत कमाई होत आहे. सध्या रिया चक्रवर्ती रूमर्ड बॉयफ्रेंड निखिल कामथसोबत बाईक राइड एन्जॉय करताना दिसली आहे. यानंतर नेटकऱ्यांनी तिला डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती रूमर्ड बॉयफ्रेंड निखिल कामथसोबत बाईक राइड करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यावेळी रियाने क्रॉप्ड रस्ट टॉपवर डेनिम जॅकेट आणि जांभळ्या पँट परिधान केली आहे. याशिवाय तिच्या चेहऱ्यावर मास्क, एक बॅग आणि चप्पल घातलेली दिसत आहे. तर निखिलने ब्लॅक जॅकेटवप शॉर्ट परिधान केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. दरम्यान हे क्याट कपल एकमेंकांना डेटिंग करत असल्याची चर्चा रंगली आहे.
रिया चक्रवर्तीचा बॉयफ्रेंड निखिल कामथ हा बिझनेसमॅन आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत २०२४ मध्ये निखिल ३.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तरुण अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. याशिवाय तो 'झिरोधा' चे संस्थापक आहेत, रिपोर्टच्या माहितीनुसार, निखिल कामथची एकूण संपत्ती ३.१ अब्ज डॉलर्स आहे. ती भारतीय चलनानुसार, 26,024 कोटी रुपये आहे.
रिया चक्रवर्तीचा सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला पुन्हा ट्रोल केलं आहे. व्हिडिओवर कॉमेंट करताना यूजर्सनी सुशांतच्या नावाने रियाला खरेखोटे सुनावले. तर काही युजर्सनी निखिलला अभिनेत्री रियाला टाळण्याचा सल्ला दिला.