

veteran actor dharmendra health condition
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल देओल परिवाराने महत्त्वाची अपडेट दिलीय.
काही दिवसांपासून ते अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली होती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. लेटेस्ट अपडेटनुसार, धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची माहिती
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ते वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देव पहलाजानी यांच्या देखरेखीखाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. मेडिकल बुलेटिन अपडेट निघण्याची प्रतीत्रा त्यांचे फॅन्स करत आहेत.
धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यास सांगण्यात आले होते.
४ नोव्हेंबर रोजी, त्यांच्या प्रकृतीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळातच ज्येष्ठ अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी विमानतळावर दिसल्या. तिथे त्यांनी माध्यमांना "ठिक आहे" असे आश्वासन देत त्यांचे पती बरे असल्याचे सांगितले होते.
शोले, चुपके चुपके, सत्यकाम, सीता और गीता, यादों की बारात आणि ड्रीम गर्ल सारखे हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (२०२३) होता. ते श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्किस' आणि 'मैने प्यार किया फिर से' मध्ये दिसतील, ज्यामध्ये ते अरबाज खानसोबत पुन्हा एकत्र येतील.
३१ ऑक्टोबर रोजी, ज्येष्ठ अभिनेत्याला पुन्हा एकदा नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरीकडे त्यांच्या टीमने माध्यमांना स्पष्ट केले की, "चिंतेचे कोणतेही कारण नाही. त्यांची तब्येत चांगली आहे आणि ते नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी वारंवार रुग्णालयात जातात."