

Sanjay dutt new look from Dhurandhar
मुंबई - लोकप्रिय अभिनेता आर माधवननंतर संजू बाबाचा धुरंधर चित्रपटातील जबरदस्त नवा लूक समोर आला आहे. निर्मात्यांनी इन्स्टा पोस्ट करून संजय दत्तचा लूक व्हायरल केला आहे. आधी अर्जुन रामपाल, नंतर आर माधवन आणि आता संजय दत्तचा लूक देखील रिलीज झाला आङे. मल्टी स्टारकास्ट चित्रपटाची आता फॅन्सा प्रतीक्षा लागून राहिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी १२ वाजून १२ मिनिटांवर रिलीज केला जाईल.
जबऱ्या नजर पाहून फॅन्स म्हणाले.. घातक
निर्मात्यांकडून जारी करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये संजय खूप इंटेंस लूकमध्ये दिसत आहे. याशिवाय, कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय-द जिन. म्हणजेच संजय दत्तची भूमिका एका जिनची असेल. शिवाय, ट्रेलरसाठी केवळ दोन दिवस शिल्लक.
आर माधवनचा यापूर्वी न पाहिलेला लूक
रविवारी अभिनेता आर माधवनचा लूक देखील जारी करण्यात आला होता. या लूकमध्ये आर माधवनच्या डोक्यावर खूप विरळ केस दिसत आहे. त्याने चष्मा घातला होता. पोस्टर शेअर करताना लिहिलं होतं- कर्म का सारथी.
हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी रिलीज होईल. अर्जुन रामपालचा देखील असाच लूक व्हायरल होत आहे.
मागील महिने टायटल ट्रॅक रिलीज
मागील महिन्यात ‘धुरंधर’चे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आलं होतं. यामध्ये रणवीर सिंहचा दमदार अंदाज पाहायला मिळाला होता. याआधी जुलै महिन्यात फर्स्ट लूक टीजर जारी करण्यात आला होता. यामध्ये संपूर्ण कास्टची एक झलक पाहायला मिळाली होती.
‘धुरंधर’चे कलाकार
रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर माधवन, सारा अर्जुन प्रमुख भूमिकाओंमध्ये दिसतील. हा एक स्पाय-थ्रिलर ॲक्शन चित्रपट असेल.