Child Actor Death: रिता शर्माने मुलांच्या अंत्यसंस्कारावेळी घेतला मोठा निर्णय

बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा यांचा मृत्यू झाला
Entertainment
बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा यांचा मृत्यूpudhari
Published on
Updated on

रविवारी कोटा येथे एक आगीचा भयानक प्रकार घडला. ज्यामध्ये 2 लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला. सिरियल वीर हनुमानमधील आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. वीर 10 वर्षांचा होता. (Latest Entertainment News)

वीरच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे?

प्राथमिक अहवालानुसार समोर येत आहे की चौथ्या मजल्यावर असलेल्या शर्मा कुटुंबाच्या ड्रॉइंग रूममध्ये आग लागली. आग आणि धूर वेगाने सगळ्या घरभर पसरले. हे दोन भाऊ ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीतही धूर प्रचंड प्रमाणात साठला. काही मदत पोहोचण्यापूर्वीच या दोन्ही भावांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

Entertainment
Punjabi Singer Accident: या पंजाबी गायकाचा गंभीर अपघात; समोर आली मोठी अपडेट

आई वडील कुठे होते?

आगीची घटना घडली तेव्हा या दोन्ही मुलांचे पालक घरी नव्हते. वीरचे वडील एका भजन कार्यक्रमात भाग घ्यायला गेले होते. तर त्याची आई रिता शर्मा त्यावेळी मुंबईमध्ये होती.

शेजाऱ्यांनी घरातून धूर आलेले पाहिले. त्यांनी जबरदस्ती दरवाजा तोडला. दोन्ही मुलांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेले. पण दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

कारणांचा शोध सुरूच

घरात लागलेल्या या आगीचे कारण शॉर्टसर्किट सांगितले जात आहे. ड्रॉइंगरूम पूर्णपणे जळून खाक झाली होती.

Entertainment
Abhishek Bachchan: अभिषेक शर्मा ऐवजी शोएब अख्तर अभिषेक बच्चन म्हणाला अन् नेटकऱ्यांनी घेतली फिरकी; अभिषेकची कमेंटही चर्चेत

मृत्यूनंतर रीताने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

आई रिता मुंबईहून आल्यानंतर मुलांचे मृतदेह त्यांच्या पालकांना सोपवले गेले. पालकांच्या इच्छेनुसार दोन्ही मुलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. दुखाचा डोंगर कोसळलेला असतानही रिताने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

दहा वर्षांच्या वीरने कमी वयात अभिनयाची सुरुवात केली. वीर हनुमान मालिकेत त्यानी बाल लक्ष्मणची भूमिका केली होती. याशिवाय एका सिनेमात त्याने सैफ अली खानच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news