लोकप्रिय पंजाबी गायक राजवीर जवंदा याचा शनिवारी शिमल्याला जाताना अपघात झाला आहे. अपघातानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. सध्या तो मोहालीच्या एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. (Latest Entertainment News)
वृत्तानुसार राजवीरची परिस्थिति गंभीर आहे. त्याला प्राथमिक उपचारानंतर फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. मेडिकल स्टाफकडून अजूनतरी राजवीरच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट दिली गेलेली नाही
त्याच्या डोक्याला लागले असून त्याची परिस्थिति गंभीर मानली जात आहे. त्याच्या बाइकचा चुराडा झाला आहे. त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी पंजाबी गायक हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत.
राजवीरने 2014 मध्ये आपल्या सांगीतिक करियरची सुरुवात केली. ‘ काली जवंदे दी' या सिनेमातून त्याला प्रसिद्धी मिळाली. राजवीरने अभिनयातही करियर केले आहे. त्याने 'मिंडो तसीलदारनी' सारख्या सिनेमात अभिनय केला. याशिवाय 'सुबेदार जोगीनदर सिंह' या सिनेमातील सहायक भूमिकाही चर्चेत होती.
मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी राजवीर पंजाब पोलिसमध्येही कार्यरत होते.