Nancy Tyagi : UPSC सोडून शिवणक्लास शिकली; तेच कपडे घालून Cannes मध्ये घडवला इतिहास

Nancy Tyagi
Nancy Tyagi

पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रान्समध्ये ७७ वा कान्स फिल्म फेस्टिव्हल सध्या चर्चेत आहे. या खास सोहळ्यात उपस्थित असलेल्या एकापेक्षा एक हॉट अभिनेत्रींच्या लूकची खूपच चर्चा होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, अभिनेत्री कियारा आडवाणी असो वा अभिनेत्री आलिया भट्ट. हॉट अभिनेत्रींनी या सोहळ्यात अनोख्या अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली. परंतु, या सोहळ्यात अभिनेत्री नसूनही एका सेलेब्रिटीने चारचाँद लावलेत. खरं तर, ती दुसरी कोणी नसून उत्तरप्रदेशची मुलगी नॅन्सी त्यागी ही आहे. तिने कान्सच्या रेड कार्पेटवर उतरताच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलंय.

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी स्वत: डिझाइन केला ड्रेस

एकीकडे बॉलिवूड, हॉलिवूड अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी लाखो-करोडो रूपये खर्चून एका मोठ्या डिझायनर्सकडून कपडे शिवून घेतात. आणि या सोहळ्यात थिरकतात आणि त्याच्या दरदार लूकची चर्चा होते. मात्र, याला एक व्यक्ती अपवाद ठरली आहे, ती म्हणजे, उत्तरप्रदेशची नॅन्सी त्यागी होय. यातील खास म्हणजे, नॅन्सीने तिचा संपूर्ण ड्रेस स्वतः तयार केला आहे. यामुळे नॅन्सीने रेड कार्पेटवर थिरकण्यासाठी स्वतःचा गाऊन स्वत: डिझाईन केल्याने हा एका नवा इतिहास घडवला गेला. २० किलोची गुलाबी फ्रिल गाऊनमध्ये नॅन्सी रेड कार्पेटवर उतरली आणि सर्वजण तिच्याकडे अवाक्‌ होवून पाहतच राहिले.

मोकळे केस, कानात इअररिग्स, गळ्यात नाजूक चेन, हातात अंगठी, मेकअप, हातात गुलाबी रंगाचे हॅडग्लोज आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. नॅन्सीने तिच्या इंस्टाग्रामवर या लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने भल्ली मोठी कॅप्शन लिहिली आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

मुलींसाठी एक उदाहरण

नॅन्सी ही यूपीमधील बरनवा या छोट्या गावातील रहिवासी आहे. छोट्यासा गावातून कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचण्याचे ही साधी गोष्ट नाही. कारण यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. नॅन्सी त्यागीने ग्राणीण भागातील मुलींसाठी हे एक उदाहरण ठेवले असे म्हणावे लागेल. कान्सच्या रेड कार्पेटवर झळकताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केलं. याशिवाय तिने स्वत: शिवून घातल्याने तिची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

UPSC चा अभ्यास सोडून शिवणक्लास शिकली

१२ वीची शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नॅन्सीने यूपीएससीतून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिल्लीला शिफ्ट झाली होती, मात्र, कोरोनाच्या काळात तिची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आणि याच काळात तिने शिवणकामाला सुरूवात केली. अनेकदा तिने शिवलेल्या हटके ड्रेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातूनच तिचे सोशल मीडियावर फॅन्स फोलोव्हर्सची संख्या वाढली आहे. शेवटी तिच्या मेहनतीचे फळ मिळाले असून ती कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली. नॅन्सीने शेअर केलेल्या फोटोला १ हजार ८९६ लोकांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nancy Tyagi (@nancytyagi___)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news