Urmila Matondkar | उर्मिला, तू किती आत्मविश्वासू आहेस !

उर्मिला, तू किती आत्मविश्वासू आहेस !
Urmila Matondkar
उर्मिला मातोंडकरinstagram
Published on
Updated on

उर्मिला मातोंडकर ही ९०च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट सिनेमांत अभिनय केला आहे. उर्मिला ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. सध्या ती बॉलीवूडपासून दूर आहे; पण आता उर्मिला चर्चेत आली आहे, ती तिच्या घटस्फोटामुळे. लम्माच्या आठ वर्षांनंतर पती मोहसीन अख्तरपासून ती विभक्त होणार आहे. यानंतर उर्मिला पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. यावेळी तिच्या बोटातील अंगठी गायब झाल्याचे सर्वांना दिसून आले. उर्मिला आणि मोहसीन बॉलीवूडमधील चर्चेतील जोडी आहे. (Urmila Matondkar)

दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. उर्मिला एका सोहळ्यात सहभागी झाली होती. जांभळा रंगाचा लेहेंगा आणि प्रिंटेड कोटमध्ये ती सोहळ्यात पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर खूपच ग्लो दिसत होता. उर्मिला या वयातही खूप सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये तिने रेड कार्पेटवर येत कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. मोहसीन हा उर्मिलाहून १० वर्षांनी लहान आहे. आता नेटकरी उर्मिलाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. उर्मिला किती आत्मविश्वासू दिसत आहे, अशी एकाने तर 'उर्मिलाचा ग्लो तर पाहा' अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. २००६ मध्ये उर्मिला आणि मोहसीन यांनी लग्नगाठ बांधली होती. (Urmila Matondkar)

Urmila Matondkar
Arshad Warsi | अर्शद आता प्रत्येक कलाकारावर प्रेम करणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news