Arshad Warsi | अर्शद आता प्रत्येक कलाकारावर प्रेम करणार

अर्शद आता प्रत्येक कलाकारावर प्रेम करणार
Arshad Warsi
अर्शद वारसीinstagram
Published on
Updated on

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अर्शद वारसी खूप चर्चेत आला आहे. अर्शदने 'कल्की २८९८-एडी' सिनेमातील प्रभासची भूमिका पाहून त्याला 'जोकर' म्हटल्यानंतर त्याची चर्चा जोरात सुरू आहे; पण त्यानंतर अर्शदवर दाक्षिणात्य कलाविश्वातून आणि प्रभासच्या चाहत्यांकडून टीका करण्यात आली होती. अखेर यावर अर्शदने पुन्हा भाष्य केले आहे. (Arshad Warsi)

एका मुलाखतीत तो म्हणाला की, अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर प्रत्येकाचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही एक सकारात्मक व्यक्ती असाल, तर कोणत्याही प्रकारची नकारात्मता तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. मी ज्या जगात वावरतो तेथे नेहमीच टीका सहन करावी लागते. याचा मला त्रास होतो. मी आता ठरवलं आहे की, मी जो सिनेमा बघेन त्यावर टीका करणार नाही. मी माझ्या उरलेल्या आयुष्यात प्रत्येक अभिनेत्यावर प्रेम करेन. मला '२८९८-एडी' हा सिनेमा आवडला नाही. माफ कर प्रभास, पण तू मला या सिनेमात जोकर वाटलास. (Arshad Warsi)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news