

Upcoming Marathi Movies
मुंबई - नवे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सयाजी शिंदे, ऐश्वर्य ठाकरे, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर अशा कलाकारांनी सजलेले अनेक मराठी चित्रपट नवे विषय आणि वेगळ्या कथा घेऊन भेटीला येत आहे.
एक शाळा, एक बंड, आणि इतिहासाशी झालेली भन्नाट गाठ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या २० जून रोजी प्रदर्शित होईल. बंदुक्या फेम दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी यांनी इबलिस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेते नामदेव मुरकुटे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन, सार्थी एंटरटेनमेंट आणि प्राजक्ता राहुल चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय निकम, पूनम शेंडे, अशोक केंद्रे, मंगेश सातपुते, नामदेव मुरकुटे आणि राजेश आहेर हे प्रमुख कलाकार असून यात ११ लहान मुलांनी देखील या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे. गायिका सावनी रविंद्र यांनी या चित्रपटातील मिरची सिंगापूरची हे गाणं गायलं आहे.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात अमर, अकबर आणि अँथनी नावाच्या तीन मित्रांच्या मैत्रीची धमाल गोष्ट पहायला मिळणार आहे. चित्रपटात ‘आप्पा’ या भाईच्या भूमिकेत सयाजी शिंदे दिसणार आहेत. हा भाई शुद्ध मराठीत बोलत अनेकांची विकेट काढताना दिसणार आहे.दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत.
येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. पटकथा, संवाद प्रियदर्शन जाधव यांनी लिहिले आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी ‘ऑल इज वेल’ चित्रपटातील गाणी गायली आहेत.
व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहेया चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. चित्रपटातील झिंगनांग चिंगनांग लै भारी गं...या प्रेमगीत वैभव जोशी यांनी लिहिलेलं आहे तर जयदीप वैद्य यांनी गायले आहे, तर संगीत आशुतोष कुलकर्णी यांचे आहे.
निशांची अनुराग कश्यप दिग्दर्शित एक क्राईम ड्रामा असून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने ही घोषणा केलीय. जार पिक्चर्सच्या बॅनरखाली, अजय राय आणि रंजन सिंग निर्मित हा चित्रपट, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे.
चित्रपटातून ऐश्वर्या ठाकरे दमदार पदार्पण करत असून, त्यांच्या सोबत वेदिका पिंटो, मोनिका पवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.