Trisha's Karuppu Cancellation: त्रिशाच्या 'करूप्पू' चित्रपटाचे शो 'धडाधड' कॅन्सल का होत आहेत? दिग्दर्शकाच्या 'त्या' पोस्टने खळबळ

Trisha's Karuppu Cancellation
Trisha's Karuppu Cancellationpudhari
Published on
Updated on

Trisha's Karuppu Cancellation: अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा करूप्पू तमिळनाडूमध्ये रिलीज होणार होता. मात्र त्याच्या रिलीजवर संकट कोसळलं असून या चित्रपटाचे एका पाठोपाठ एक शो हे कॅन्सल होत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचा सकाळचा शो कॅन्सल झाला होता. आता चेन्नईतील थेएटर्सनी सायंकाळचा आणि रात्रीचा शो देखील रद्द केला आहे.

Trisha's Karuppu Cancellation
Thalapathy Vijay | OTT वर Jana Nayagan साठी कोट्यवधींची बोली? मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये स्पर्धा

चेन्नईतील EGA सिनेमाने ट्विट केलं की, 'निर्मात्याच्या काही आर्थिक कारणांमुळे दुपारी १२.३० चा चित्रपटाचा शो कॅन्सल करण्यात येत आहे. रिफंड परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी तिकीट काढले आहे त्यांच्या मोबाईल नंबरवर शो कॅन्सल झाल्याचे मेसेज पाठवण्यात येत आहेत. तसदीबद्दल खेद आहे.'

Trisha's Karuppu Cancellation
Raja Shivaji X Reviews: अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी... रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट कसा आहे?

नेमकं काय घडतंय?

आरजे बालाजी यांनी निर्देशित केलेला हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र निर्माता आणि गुंतवणूकदार यांच्यातील काही आर्थिक व्यवहार अपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी चित्रपट प्रदर्शन पुढं ढकललं आहे.

मात्र असं असलं तरी याबाबत अधिकृत माहिती निर्मात्यांकडून देण्यात आलेली नाही. चित्रपट का रिलीज होत नाहीये आणि तो कधी रिलीज होणार याबाबत थिएटर आणि प्रेक्षकांना अजूनही स्पष्टता मिळालेली नाही.

वेट्टरी थिएटर्स, कमला सिनेमा, जीके सिनेमा, इजीए सिनेमा या प्रमुख थिएटर चेन्सने प्रेक्षकांना ट्विटर हँडलवरून संध्याकाळचे शो कॅन्सल झाल्याची आणि रिफंड देत असल्याची माहिती दिली.

Trisha's Karuppu Cancellation
Nagraj Manjule Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’मधून नागराज मंजुळे बाहेर का पडले? रितेश देशमुखने सांगितलं खरं कारण

मुख्यमंत्र्यांची विशेष परवानगी तरी...

विशेष म्हणजे तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी चित्रपटाच्या सकाळी ९ वाजताच्या शो ला विशेष परवानगी दिल्यानंतरही चित्रपटाचे शो रद्द केले जात आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून चाहत्यांनी या चित्रपटाचे सकाळच्या शो ची तिकिटे बूक करताना अडचणी येत आहेत अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत होते.

Trisha's Karuppu Cancellation
Vilasrao Deshmukh-Genelia |'हाय अंकल'! जेव्हा जेनेलियाने विलासराव देशमुखांना मारली हाक; अशी होती रिॲक्शन, रितेशने सांगितला 'तो' भन्नाट किस्सा

माझ्याकडे कारण नाही...

दरम्यान, दिग्दर्शक आरजे बालाजी यांनी एक्सवर ट्विट केलं की, 'प्रिय चाहत्यांनो सध्याच्या परिस्थितीचे माझ्याकडे ठोस असे कारण नाही. निर्माते ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा चित्रपट नेहमीच अडचणीत येत राहिला आहे. मात्र परमेश्वराने या सर्वातून मार्ग काढून दिला. ३२ महिन्यानंतर आता आम्ही रिलीजसाठी सज्ज होतो. यावेळी देखील परमेश्वर मार्ग काढेल माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news