Vilasrao Deshmukh-Genelia |'हाय अंकल'! जेव्हा जेनेलियाने विलासराव देशमुखांना मारली हाक; अशी होती रिॲक्शन, रितेशने सांगितला 'तो' भन्नाट किस्सा

Vilasrao Deshmukh-Genelia story in the house | हाय अंकल! जेव्हा जेनेलियाने मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना मारली हाक; अशी होती रिॲक्शन, रितेशने सांगितला 'तो' भन्नाट किस्सा
Vilasrao Deshmukh-Genelia
Vilasrao Deshmukh-Genelia story in the house pudhari photo
Published on
Updated on

Vilasrao Deshmukh-Genelia story in the house

रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या प्रेमकथेतील एक भन्नाट किस्सा! जेव्हा जेनेलियाने थेट विलासराव देशमुख यांना 'अंकल' म्हणून हाक मारली, तेव्हा काय घडलं? रितेश देशमुखने 'द कपिल शर्मा शो' आणि एका मराठी चॅट शोमध्ये त्यांच्या पहिल्या भेटीचा हा मजेशीर किस्सा सांगितला होता. जेनेलिया ही दाक्षिणात्य आणि ख्रिश्चन वातावरणात वाढलेली. ती बिनधास्त अन्‌ बोलकी होती.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा ही जोडी बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सर्वात 'क्युट' जोडी म्हणून ओळखली जाते. त्यांच्या प्रेमाचे किस्से जितके रोमँटिक आहेत, तितकेच ते मजेशीरही आहेत. असाच एक किस्सा रितेशने एका शोमध्ये शेअर केला होता, जेव्हा जेनेलिया पहिल्यांदा रितेशच्या घरी म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेली होती.

नेमकं काय घडलं होतं?

रितेशने सांगितलं की, जेनेलिया सुरुवातीला खूप 'कॅज्युअल' होती. एकदा जेनेलिया रितेशला भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. त्यावेळी रितेशचे वडील आणि विलासराव देशमुख हे बंगल्याच्या गार्डनमध्ये काही महत्त्वाच्या लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी मिटींग करत होते.

जेनेलियाचं ते 'हाय अंकल'

अशावेळी जेनेलियाने गेटमधून एन्ट्री घेतली. ती घरात येत असतानाच तिला विलासराव देशमुख दिसले. याबाबतचा किस्सा जेनेलियाचा पती, अभिनेता रितेशने एका शोमध्ये सांगितला होता. रितेश म्हणाला की, जेनेलियाने आतमध्ये एन्ट्री घेतली. ती फुल एनर्जीमध्ये येत होती. दुसरीकेड बाबा (विलासराव देशमुख) गार्डनमध्ये मीटिंग करत होते. बाबांना समोर पाहताच तिने कोणताच संकोच न बाळगता हात उंचावला आणि जोरात म्हणाली, "हाय अंकल!". तिथे उपस्थित असलेले अधिकारी आणि सुरक्षा रक्षक क्षणभर अवाक झाले.

अशी होती विलासराव देशमुख यांची रिॲक्शन

रितेशने पुढे सांगितलं की, जेव्हा जेनेलियाने त्यांना हाक मारली, तेव्हा विलासरावांनी अतिशय शांतपणे रिॲक्शन दिली, त्यांनी मान हलवली. हे सगळं चित्र रितेशने आतून पाहिलं होतं.

Vilasrao Deshmukh-Genelia
Raja Shivaji Sanjay Dutt Role |कांचा चिना, अधीरा अन् आता इतिहासातील सर्वात क्रूर शत्रू साकारणार; 'राजा शिवाजी' चित्रपटामधील संजय दत्तच्या अवताराची चर्चा

मैत्रीतून प्रेमाचा प्रवास

सुरुवातीला जेनेलियाला माहिती नव्हतं की, रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. दुसरीकडे, विलासराव यांना जेनेलियाचा हाच मोकळा स्वभाव खूप आवडला होता. पुढे जाऊन जेनेलया देशमुखांची सून झाली.

Vilasrao Deshmukh-Genelia
Raja Shivaji Movie Ajay Atul | १ मे रोजी उलगडणार स्वराज्याचा इतिहास! 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल रितेश देशमुखने दिली मोठी अपडेट; पाहा जबरदस्त पोस्टर

आज रितेश आणि जेनेलिया लग्नानंतरही चित्रपटात एकत्र काम करताहेत. त्यांचा आगामी चित्रपट 'राजा शिवाजी' खूप चर्चेत आहे. चित्रपट १ मे रोजी रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news